कॉम्पेक्स-२०१५ उद्यापासून

By Admin | Published: January 14, 2015 12:42 AM2015-01-14T00:42:57+5:302015-01-14T00:42:57+5:30

विदर्भ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कॉम्पेक्स एक्स्पो-२०१५ व डेस्टिनेशन आयटीचे पाच दिवसीय आयोजन कस्तूरचंद पार्कवर १५ जानेवारीपासून होणार आहे.

Compex-2015 from tomorrow | कॉम्पेक्स-२०१५ उद्यापासून

कॉम्पेक्स-२०१५ उद्यापासून

googlenewsNext

‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे आयोजन : नामांकित कंपन्या, करिअर व बिझनेस सेमिनार
नागपूर : विदर्भ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कॉम्पेक्स एक्स्पो-२०१५ व डेस्टिनेशन आयटीचे पाच दिवसीय आयोजन कस्तूरचंद पार्कवर १५ जानेवारीपासून होणार आहे. यंदा एक्स्पोचे २३ वे वर्ष आहे. उद्घाटन दुपारी २ वाजता होणार असून एक्स्पो दररोज दुपारी १२ ते रात्री ९ या वेळात सुरू राहील.
‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे अध्यक्ष प्रशांत उगेमुगे यांनी सांगितले की, आयटी क्षेत्रातील उद्योजक व व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींची माहिती राज्य सरकारला करून देण्याच्या उद्देशाने असोसिएशनतर्फे १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता डेस्टिनेशन आयटीचे आयोजन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उद्योजक समस्या मांडतील. आयटी क्षेत्राला प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याची बाब चुकीची आहे. यंदा एक्स्पोमध्ये सुरक्षात्मक उपकरणे , सीसीटीव्ही, घरगुती सुरक्षा, वायफाय सुरक्षा कॅमेरे, पीटीझेड हायरेंज उत्पादने प्रदर्शित करण्यात येणार आहे.
आयटी करिअर व
बिझनेस सेमिनार
सायबर सिक्युरिटी, डाटा सेंटर, डाटा मॅनेजमेंट व स्टोरेज यावरील चर्चासत्रात मायक्रोसॉफ्ट, कास्परस्कॉय, डेल, आयबीएम या नामांकित कंपन्यातर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
२० पॅव्हेलियन व ७२ स्टॉल
देशविदेशातील सर्वच नामांकित कंपन्यांची उत्पादने प्रदर्शनात राहतील. यंदा टेक्नॉलाजीवर विशेष भर राहील. ४० टक्के व्यवसाय एक्स्पोमधून होतो.
नॅशनल ई-गहर्नन्स अवॉर्ड
लोकांच्या हिताच्या गोष्टी तयार करणाऱ्यांना असो.तर्फे नॅशनल गव्हर्नन्स पुरस्कार देण्यात येणार आहे.
पत्रपरिषदेत व्हीसीएमडीडब्ल्यूएचे सचिव विनोद वर्मा, कोषाध्यक्ष मनोज कुल्लरवार, सहसचिव नरेश घोरमारे आणि अन्य पदाधिकारी हजर होते. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Compex-2015 from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.