विजेच्या तारा लोंबळकत असल्यास व्हॉटस्ॲपवर करा तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:09+5:302021-01-23T04:08:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जर कुठे तुटलेल्या वीजतारा, जमिनीवर लोंबकळत असलेल्या तारा, फ्यूज पेट्या, फिडर पिलरचे दरवाजे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जर कुठे तुटलेल्या वीजतारा, जमिनीवर लोंबकळत असलेल्या तारा, फ्यूज पेट्या, फिडर पिलरचे दरवाजे तुटलेले असतील, तसेच रोहित्रांचे कुंपण उघडे असणे, खोदकामामुळे भूमिगत केबल उघड्यावर पडली असेल तर नागरिक आता याची थेट व्हॉटस्ॲपवर तक्रार करू शकतील. महावितरणने यासाठी दोन व्हॉटस्ॲप नंबर जाहीर केले आहेत.
महावितरणने म्हटले आहे की, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार हा पुढाकार घेण्यात आला आहे. उपरोक्त परिस्थितीमुळे धोकादायक स्थिती निर्माण होते. यावर त्वरित उपाययोजना करून वीज यंत्रणा तत्काळ दुरुस्त करता यावी, या उद्देशाने
हा पुढाकार घेण्यात आला आहे. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही समस्या तातडीने सोडवता येणे शक्य होईल. यासाठी कंपनीने नागपूर शहरासोबतच बुटीबोरी व हिंगणा तालुक्यासाठी ७८७५०१००५२ हा क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. उर्वरित ग्राहकांसाठी ७८७५७६६६१९ हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, या नंबरवर केवळ व्हॉटस्अपच्या माध्यमातूनच तक्रार पाठवता येऊ शकेल. ग्राहकांना यासाठी संबंधित जागेचा फोटो व सविस्तर पत्ता पाठवावा लागेल. ज्या नागरिकांकडे व्हॉटस्ॲप नाही. ते एसएमएसवरही माहिती पाठवू शकतील. समस्येचे निराकरण झाल्यावर नागरिकांना पुन्हा त्या जागेचा फोटो पाठवण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. नागपूर परीक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.