बालिका वधूची पोलिसात तक्रार

By Admin | Published: July 29, 2016 02:39 AM2016-07-29T02:39:22+5:302016-07-29T02:39:22+5:30

४० हजार रुपये घेऊन आई-वडिलांनी आपल्या १४ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय आरोपीशी विवाह लावून दिला.

Complaint against Balika Vadhu police | बालिका वधूची पोलिसात तक्रार

बालिका वधूची पोलिसात तक्रार

googlenewsNext

४० हजारात विकले : आई-वडिलांसह तिघांना अटक
नागपूर : ४० हजार रुपये घेऊन आई-वडिलांनी आपल्या १४ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय आरोपीशी विवाह लावून दिला. पैसे देऊन विकत घेतल्यामुळे आरोपीने त्या मुलीवर अत्याचार करणे सुरू केले. तब्बल दीड वर्षे नरकयातना भोगणाऱ्या मुलीने शारीरिक आणि मानसिक अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे संतापजनक प्रकरण उघडकीस आले.
तक्रार करणारी बालिका वधू केवळ १६ वर्षांची आहे. बिनाकी मंगळवारीत राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांनी कोतवालीतील शंकर ऊर्फ सुधाकर गणपतराव मौंदेकर (वय २८) याच्याकडून ४० हजार रुपये घेऊन ६ आॅगस्ट २०१४ ला तिचे लग्न लावून दिले. त्यावेळी बालिका वधू अवघी १४ वर्षांची होती. ती आठवीत शिकत होती. लग्न करून घरी आणल्यानंतर आरोपी मौंदेकर बालिकेचे शारीरिक शोषण करू लागला. तब्बल दीड वर्षे नरकयातना भोगल्यानंतर २० एप्रिल २०१६ मध्ये ती पतीच्या घरून वेगळ्या ठिकाणी राहू लागली. आरोपी तेथेही येऊन तिला त्रास देऊ लागला. त्याचा त्रास असह्य झाल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून बालिका वधू बुधवारी कोतवाली ठाण्यात पोहोचली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक युवराज सहारे यांनी तिचा पती सुधाकर मौंदेकर, आई राधिका आणि वडील अशोक निखारे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)

सामाजिक क्षेत्रात खळबळ
लग्न लावण्याच्या नावाखाली स्वत:च्या अल्पवयीन मुलीला विकण्याचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अनेक पैलू अंधारात असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Complaint against Balika Vadhu police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.