टपाल खात्यातील बोगस नियुक्ती आदेशप्रकरणी विलंबाने तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:25+5:302021-03-05T04:08:25+5:30

नागपूर : टपाल खात्यामध्ये ब्रांच सर्व्हिस ऑपरेटर पदावर नोकरी लावून देण्याच्या बेरोजगारांची नावाखाली फसवणूक करण्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसात बुधवारी सायंकाळी ...

Complaint of delay in bogus appointment order in postal department | टपाल खात्यातील बोगस नियुक्ती आदेशप्रकरणी विलंबाने तक्रार

टपाल खात्यातील बोगस नियुक्ती आदेशप्रकरणी विलंबाने तक्रार

Next

नागपूर : टपाल खात्यामध्ये ब्रांच सर्व्हिस ऑपरेटर पदावर नोकरी लावून देण्याच्या बेरोजगारांची नावाखाली फसवणूक करण्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसात बुधवारी सायंकाळी तक्रार दाखल करण्यात आली. प्रत्यक्षात बुधवारी दुपारपर्यंत आरोपी आणि फसवणूक झालेले बेरोजगार टप्प्यात होते. मात्र सायंकाळी उशिरा तक्रार दाखल झाल्याने पोलिसांचे तपासकार्य वाढणार आहे.

मुख्य टपाल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करताना काही फोटो आणि मोबाईल शुटींगचे फुटेज सादर केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेल्यांपैकी तीन जणांनी आपबिती सांगितली. मात्र लेखी बयान देण्यास नकार दिला. तीन वाहनांमधून कथित ठगबाज परिसरात फिरत होते. काहींना नियुक्तीपत्र दिले. अद्यापर्यंत नोकरीसाठी रक्कम घेतल्याबद्दल तक्रार करण्यासाठी पोलिसात कुणीही पुढे आलेले नाही. ज्या पदासाठी बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले, ते पदच टपाल खात्यात नाही. अडीच-तीन वर्षापूर्वी खात्यात डाकसेवकांच्या नियुक्त्या झाल्या. त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमानुसार केल्या होत्या.

...

चौकशी करणार

सीताबर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी अतुल सबनीस म्हणाले, याप्रकरणी चौफेर तपास केला जाईल. टपाल खात्यातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली असली तरी, अद्याप तक्रारीसाठी कुणी पुढे आलेले नाही.

...

कोट

टपाल खात्यातील भरतीची जाहिरात अधिकृतपणे वेबसाईटवर येते. त्यासाठी नोटिफिकेशन काढल्यावर ऑनलाईन अर्ज मागविले जातात. त्यामुळे युवकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये.

- रामचंद जायभाय, पोस्टमास्तर जनरल

...

Web Title: Complaint of delay in bogus appointment order in postal department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.