नागपुरातील बिल्डर विजय डांगरेविरुद्ध फसवणुकीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 08:14 PM2019-10-30T20:14:49+5:302019-10-30T20:16:09+5:30
नंदनवन येथील सेवानिवृत्त महापालिका कर्मचारी प्रदीप नीळकंठ खोडे यांनी बिल्डर विजय डांगरे यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन येथील सेवानिवृत्त महापालिका कर्मचारी प्रदीप नीळकंठ खोडे यांनी बिल्डर विजय डांगरे यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.
डांगरे हे महाराजा डेव्हलपर्सचे संचालक असून, त्यांच्या ‘स्वराज पार्क’ योजनेतील दोन बंगले (क्र. ११ व २४) खरेदी केले होते. तसेच, डांगरे यांना ७ लाख २५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर डांगरे यांनी बंगल्यांचा ताबा दिला नाही व पैसेही परत केले नाही. आता त्यांनी या योजनेची जमीन श्री गजानन महाराज डेव्हलपर्सचे संचालक दुधराम सव्वालाखे यांना १० कोटी ५१ लाख रुपयात विकली आहे. त्यासंदर्भात १२ ऑक्टोबर २०१९ रोजी करारनामा झाला आहे. डांगरे यांच्या या कृतीमुळे आपली फसवणूक झाली. करिता, डांगरे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे खोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.