१४ वर्षांच्या मुलीची बलात्काराची तीन वर्षांनंतर तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:28 AM2021-06-07T09:28:04+5:302021-06-07T09:28:38+5:30

Nagpur news घरमालक, त्याचा भाऊ आणि एका मित्राने तीन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या वेळी आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार एका १४ वर्षांच्या मुलीने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दिली.

Complaint of rape of 14-year-old girl after three years | १४ वर्षांच्या मुलीची बलात्काराची तीन वर्षांनंतर तक्रार

१४ वर्षांच्या मुलीची बलात्काराची तीन वर्षांनंतर तक्रार

Next
ठळक मुद्देया प्रकरणातील तक्रारदार मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही केली. तीन वर्षे पीडित मुलगी गप्प का होती, त्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याचे पोलिसांचे मत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरमालक, त्याचा भाऊ आणि एका मित्राने तीन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या वेळी आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार एका १४ वर्षांच्या मुलीने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून वॉल्टर ख्रिस्तोफर पांडे (वय २५), मारिओ ख्रिस्तोफर (वय २८) आणि अजय टाले (वय २५) नामक आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तीनही आरोपी गिट्टीखदानमध्ये राहतात. आरोपी वॉल्टरच्या घरी मुलीचे कुटुंबीय भाड्याने राहत होते. मुलीचे आई-वडील खासगी काम करतात. तिने आठवीची परीक्षा दिली असून, तिला एक मोठी बहीणही आहे. मेअखेरीस मुलीच्या कुटुंबीयांनी वॉल्टरचे घर सोडले. त्यानंतर ३ जूनला मुलीने तिच्या आईला माहिती सांगून गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीनुसार, वॉल्टरकडे भाड्याने राहत असताना तीन ते चार वर्षांपूर्वी त्याने एकदा घरी कुणी नसल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याचा भाऊ मारिओ तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता. तिसरा आरोपी टाले याच्यासोबत तिची मैत्री होती. ती त्याच्याशी ऑनलाइन संपर्कात होती. त्यानेही तिच्यावर अतिप्रसंग केला, असे तिने तक्रारीत नमूद केले. त्यावरून गिट्टीखदान पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार बलात्कार तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करून या तिघांनाही अटक केली. दोन दिवस पीसीआर घेतल्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

---

Web Title: Complaint of rape of 14-year-old girl after three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.