स्थायी समितीची भाजप संघटनेकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:15+5:302021-08-01T04:09:15+5:30

कामकाजावर सत्तापक्षातील नगरसेवक नाराज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन वर्षापासून शहरातील विकास कामे ठप्प असल्याने सत्तापक्षातील नगरसेवकांत नाराजी ...

Complaint of Standing Committee to BJP organization | स्थायी समितीची भाजप संघटनेकडे तक्रार

स्थायी समितीची भाजप संघटनेकडे तक्रार

Next

कामकाजावर सत्तापक्षातील नगरसेवक नाराज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन वर्षापासून शहरातील विकास कामे ठप्प असल्याने सत्तापक्षातील नगरसेवकांत नाराजी आहे. फाईल मंजुरीसाठी मनपा मुख्यालयात चकरा मारत आहेत. या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार माजी उपमहापौर यांचा स्थायी समिती कक्षात विकास कामावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने अश्रू पुसत त्या कक्षातून बाहेर पडल्या. दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडला. या संदर्भात भाजप संघटनेचे पदाधिकारी व आमदारांकडे तक्रार करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार या मुद्यावर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. सध्या तारीख निश्चित नाही. परंतु लवकरच ही बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीत स्थायी समितीकडून फाईल मंजूर होत नसल्याबाबतचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. विकास कामामुळे मागील निवडणुकीत भाजपला विक्रमी यश मिळाले होते. परंतु गेल्या दोन वर्षात शहरातील विकास कामे ठप्प आहेत. सिवरेज लाईन, चेंबर, रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती अशी लहानसहान कामे होत नाही. यामुळे नागरिकांच्या रोषाला भाजप नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत मनपा निवडणुकीला सामोरे कसे जायचे असा प्रश्न नगरसेकांना पडला आहे. निवडणुकीत यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मनपात १० ते १२ नगरसेवकांची कामे होतात. पूर्व, मध्य, दक्षिण व उत्तर नागपुरातील विकास कामाच्या फाईल गतीने पुढे जात नाही. विशेष म्हणजे यात महिला नगरसेविकांच्या फाईलचा समावेश आहे. अशा मुद्यावरून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

..............

जनविरोधी निर्णय

मनपात १९४ ऑपरेटर मागील १५ ते २० वर्षापासून सेवा देत आहेत. किमान वेतन श्रेणी नुसार त्यांना २३ ते २५ हजार रुपये दर महिन्याला वेतन मिळते. परंतु सत्तापक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे वेतनावरील संगणक ऑपरेटरला १५५०० रुपये मानधनावर नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्या निविदा काढून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आला आहे. परंतु वेतनात ७ ते ९ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत वेतन कपात तर्कसंगत नसल्याचे ऑपरेटरचे म्हणणे आहे.

Web Title: Complaint of Standing Committee to BJP organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.