नागपूर विभागातील ब्रॉडगेजची सर्व कामे वेळेत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:39 AM2018-04-10T00:39:49+5:302018-04-10T00:40:02+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कळमना-गोधनी नव्या लाईनचे निरीक्षण केले. त्यानंतर आयोजित समीक्षा बैठकीत विभागात सुरू असलेली ब्रॉडगेजची कामे ठरविलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कळमना-गोधनी नव्या लाईनचे निरीक्षण केले. त्यानंतर आयोजित समीक्षा बैठकीत विभागात सुरू असलेली ब्रॉडगेजची कामे ठरविलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत अभियांत्रिकी विभागातर्फे अनेक योजना साकारण्यात येत आहेत. या योजना निर्धारित केलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी या योजनांना भेटी देऊन या योजना पूर्ण करण्याच्या मार्गातील अडथळे दूर केले. भेटीदरम्यान ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल, बिलासपूर मुख्यालयातील विभागाध्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर दपूम रेल्वेच्या कार्यालयातील सभागृहात समीक्षा बैठक आयोजित केली. बैठकीत त्यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन विकासकामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी कामात गती आणण्याचे आवाहन केले. त्यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विभागातील विकासकामांची माहिती घेऊन प्रवासी सुविधांबाबत चर्चा केली.
................
अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसचा अपघात दुर्दैवी : लोहानी
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी संभलपूर विभागातील अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसचा अपघात दुर्दैवी असल्याचे सांगून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. या घटनेतील रेल्वे कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेगाड्यांचा अपघात होऊ नये यासाठी रेल्वे कटिबद्ध असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी कर्मचाºयांना संवेदनशील बनविण्यासाठी एक महिन्याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना पुरविण्यात येणाºया सुविधा ही रेल्वेची प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
...............