विपश्यना मेडिटेशन सेंटर परिसरात सुविधा पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:27 AM2017-09-12T00:27:56+5:302017-09-12T00:28:13+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संभाव्य नागपूर तसेच कामठी येथे डॅÑगन पॅलेस परिसरातील विपश्यना मेडिटेशन केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी....

Complete the facility in Vipassana Meditation Center area | विपश्यना मेडिटेशन सेंटर परिसरात सुविधा पूर्ण करा

विपश्यना मेडिटेशन सेंटर परिसरात सुविधा पूर्ण करा

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : राष्ट्रपतींच्या दौरा कार्यक्रमाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संभाव्य नागपूर तसेच कामठी येथे डॅÑगन पॅलेस परिसरातील विपश्यना मेडिटेशन केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी विविध शासकीय यंत्रणांतर्फे करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत आढावा घेतला.
कामठी येथील डॅÑगन पॅलेस येथे राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौरा संदर्भातील व्यवस्था आढावा बैठकीस केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, अपर पोलीस आयुक्त श्यामराव दिगावकर, पोलीस उपआयुक्त रामसिंग परदेशी, नीलेश भरणे, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता आर.जी. शेख, सामाजिक न्याय विभागाचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संभाव्य दौºयानुसार ड्रॅगन पॅलेस परिसरातील मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन करणार असून, त्या अनुषंगाने करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रपती यांच्या आगमनापासून तर प्रयाणापर्यंत करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या नियोजनानुसार हेलिपॅड, रस्त्याची सुधारणा, कार्यक्रमस्थळी करावयाच्या आवश्यक सुविधा यासंदर्भात आढावा घेऊन विविध विभागाने सोपविलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना विभागप्रमुखांना यावेळी दिल्या. प्रारंभी अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी मेडिटेशन सेंटर तसेच राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौºयाबाबत यावेळी माहिती दिली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौºयानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेसंदर्भात यावेळी माहिती देताना रस्ते, वीज तसेच पाण्याच्या संदर्भात विभागप्रमुखांनी अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. पोलीस विभागातर्फे व्यवस्थेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Web Title: Complete the facility in Vipassana Meditation Center area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.