अपूर्ण कामे आधी पूर्ण करा

By admin | Published: May 26, 2017 02:53 AM2017-05-26T02:53:05+5:302017-05-26T02:53:05+5:30

तालुक्यात रस्त्यांची, पुलांची, समाजभवनाची सुरू झालेली कामे आधी पूर्ण करा. कोणत्याही स्थितीत अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय

Complete the incomplete tasks first | अपूर्ण कामे आधी पूर्ण करा

अपूर्ण कामे आधी पूर्ण करा

Next

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : कामठी पंचायत समितीची आमसभा
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यात रस्त्यांची, पुलांची, समाजभवनाची सुरू झालेली कामे आधी पूर्ण करा. कोणत्याही स्थितीत अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन कामे सुरू करायची नाही. कंत्राटदाराने जुने काम पूर्ण केल्याशिवाय त्याला नवीन कामे देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कामठी पंचायत समितीची आमसभा गुरुवारी पार पडली. या आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील, भाजप नेते अनिल निधान, सभापती अनिता चिकटे, सभापती उकेश चव्हाण, मदन राजुरकर, बाळू गवते, तालुका अध्यक्ष रमेश चिकटे आदी उपस्थित होते. विविध शासकीय विभागाचा संपूर्ण आढावा याप्रसंगी घेण्यात आला. नागरिकांच्या विविध तक्रारींवर बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले.
कृषी विभागाचा आढावा घेताना एकही कृषी सहायक मुख्यालयी राहात नसल्याचे आढळून आले. यानंतर दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृषी सहायकांनी आपापल्या ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांचे मेळावे घ्यायचे. त्यांना शासनाच्या योजनांची माहिती द्यायची आणि मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदार व त्यांची चमू तसेच बीडीओंनी एक महिन्यात चार गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून त्या सोडवाव्या. शेतकऱ्यांच्या विषयावर कोणताही समझोता होणार नाही. कृषी विभागाच्या योजनांचा प्रचार प्रसार केला जात नाही. भूगावमध्ये कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना माहिती नसल्याची तक्रार यावेळी समोर आली. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या. आरोग्य विभागाचा आढावा घेताना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पाण्याच्या टाक्या टँन की पद्धतीने स्वच्छ करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. बांधकाम विभागाला मोठ्या प्रमाणात निधी शासनाने दिला असताना अपूर्ण कामांची ओरड का होते आहे. निधी मंजूर केला असताना रस्त्यांची आणि पुलांची अनेक कामे अजून सुरू होऊ शकली नाहीत. कामठीच्या प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम अजूनही झाले नाही. पावनगाव, रनाळा, कापसी, भूगाव येथील रस्त्यांच्या अनेक तक्रारी यावेळी करण्यात आल्या. यावर दक्षता पथकातर्फे रस्त्यांची कधीही तपासणी होऊ शकते, असे संकेत पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Complete the incomplete tasks first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.