चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 11:57 AM2023-09-02T11:57:12+5:302023-09-02T11:58:33+5:30

जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा

Complete irrigation projects in Chandrapur and Gadchiroli districts immediately - Sudhir Mungantiwar | चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा - सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

नागपूर : चंद्रपूरगडचिरोली जिल्ह्यांतील प्रलंबित असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचन विभागाला दिल्या.

सिव्हिल लाईन्स येथील हरीसिंग नाईक सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, मृदू व जलसंधारणचे अधीक्षक अभियंता नितीन दुसाने, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे बैठकीला उपस्थित होते.

वनबाधित सिंचन प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सिंचन व वनविभागाने विशेष बैठक घेऊन वेगाने पूर्ण होऊ शकणाऱ्या निवडक प्रकल्पाची यादी तयार करावी व त्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. वन कायद्यामुळे १९८३ पासून प्रलंबित असलेल्या ताडोबा वनक्षेत्रातील हुमान नदी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीनुसार झालेला बदल लक्षात घेता या सिंचन प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गात खरोखरच अडचण येते का, यासंबंधीची तपासणी करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसायासाठी मॉडेल जिल्हा म्हणून विकसित करावयाचा आहे. या संबंधात विशेष बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले.

- मामा तलाव दुरुस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापनाचा राखीव निधी वापरा

नागपूर विभागात नवीन सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळण्यासाठी सिंचन अनुशेष तपासणीतील माजी मालगुजारी (मामा) तलाव यादीतून वगळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे अवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील १६७८ पैकी ११०० मामा तलाव व गडचिरोली जिल्ह्यातील १६०३ पैकी ४७५ मामा तलावांचा दुरुस्ती कार्यक्रम राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. दृष्काळसदृश परिस्थिती टाळण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापनसाठी राखीव जिल्हा नियोजनचा पाच टक्के निधी मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी वापरण्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Complete irrigation projects in Chandrapur and Gadchiroli districts immediately - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.