खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्प त्वरित पूर्ण करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:06+5:302021-02-12T04:08:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील (ता. बाभुळगाव) खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम मूळ प्रकल्प अहवालानुसार त्वरित पूर्ण ...

Complete Kharda Small Irrigation Project Quickly () | खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्प त्वरित पूर्ण करा ()

खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्प त्वरित पूर्ण करा ()

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील (ता. बाभुळगाव) खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम मूळ प्रकल्प अहवालानुसार त्वरित पूर्ण करून मौजा सरुळ गावाचे पुनर्वसन तातडीने करावे, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी येथे दिले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळााच्या सभागृहात राज्यमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्यासह विदर्भ विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अमराावती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादुरे, यवतमाळ प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी कडू म्हणाले, आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना बंद नलिका वितरण प्रणालीमार्फत लाभक्षेत्रातील १,१७५ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ होईल. यासाठी मूळ प्रकल्प अहवालानुसार खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्प त्वरित पूर्ण करताना सरुळ गावाचे पुनर्वसन प्रस्तावित करून मूळ प्रकल्प अहवालानुसार पूर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तातडीने सादर करावा.

पूर्वी खर्डा प्रकल्पामध्ये सरुळ गावाचे पुनर्वसन प्रस्तावित होते. १,१७५ हेक्टरमध्ये बाभुळगाव तालुक्यातील सात गावांना या सिंचनाचा लाभ मिळणार होता. प्रकल्पास २९ कोटी १६ लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता १९ डिसेंबर २००६ रोजी प्राप्त झाली होती. त्यानंतर सरुळ गावाचे पुनर्वसन वगळून प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता सादर करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. परंतु राज्यमंत्री कडू यांनी सरुळ गावाचे पुनर्वसन करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा व्हावा, यासाठी पूर्वीच्या मूळ प्रकल्पानुसार खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या.

Web Title: Complete Kharda Small Irrigation Project Quickly ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.