कस्तुरचंद पार्क स्मारकाची दुरुस्ती गणतंत्रदिनापूर्वी पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By आनंद डेकाटे | Published: August 24, 2023 01:47 PM2023-08-24T13:47:09+5:302023-08-24T13:47:31+5:30
या कामासाठी योग्य वास्तुविशारदाची निवड करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
नागपूर : कस्तुरचंद पार्क स्मारक परिसरातील सभागृहाचे काम अजूनही पूर्णत्वास आले नाही, या कामास गती देवून संपूर्ण कस्तुरचंद पार्क स्मारकाची दुरुस्ती गणतंत्रदिनापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात कस्तुरचंद पार्कबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, नझूल तहसीलदार सीमा गजभिये, महानगर पालिकेच्या हेरिटेज समितीचे गावंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन या कामाशी संबंधित नझूल जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.
या कामासाठी योग्य वास्तुविशारदाची निवड करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याकामास लागणारा ६० लक्ष रुपयांचा निधी लवकरच देण्यात येईल. त्यासोबतच वाढीव खर्च येत असल्यास त्याचेही नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले