१५ जूनपर्यंत नदी स्वच्छता अभियान पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:10 AM2021-05-05T04:10:43+5:302021-05-05T04:10:43+5:30
महापौरांचे निर्देश : स्वच्छता कामाचा आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने नाग नदी, पिवळी नदी व पोहरा ...
महापौरांचे निर्देश : स्वच्छता कामाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीची स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला दिले.
तिन्ही नद्यांमध्ये दहा उपभागात नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे. यासाठी महामेट्रोकडून ५, विश्वराज इंफ्रालिमिटेड, ऑरेंज सिटी वाटर, स्मार्ट सिटी, नागपूर सुधार प्रन्यास व राष्ट्रीय महामार्गकडून प्रत्येकी एक पोकलॅन प्राप्त झाले आहे. आतापर्यंत नाग नदीमध्ये २.३६ किमी, पिवळी नदीमध्ये २.२१ किमी व पोहरा नदी मध्ये २.२ किमी पर्यंत काम झाले आहे.
महापौरांनी कामाची पाहणी केली. यावेळी माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.
नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नद्यांचे उपभाग करण्यात आले असून, यामध्ये प्रत्येकी एक उपअभियंता व एक सी.एस.ओ. लावण्यात येणार आहे. या कामाचे दायित्व अधीक्षक अभियंता मनोज तालेवार आणि नदी व सरोवर प्रकल्पचे सल्लागार मो. इजराईलकडे देण्यात आले आहे.
...
नदी स्वच्छता अभियानासाठी नाग, पिवळी व पोहरा नदीचे भाग करण्यात आले आहे.
नाग नदी
- अंबाझरी तलाव ते पंचशील चौक
- पंचशील चौक ते अशोक चौक
- अशोक चौक ते सेंट झेविअर स्कूल
- सेंट झेविअर स्कूल ते पारडी ब्रिज (भंडारा रोड)
- पारडी ब्रिज ते पूनापूर (भरतवाडा झ्र नाग व पिवळी नदी संगम)
...
पिवळी नदी
- गोरेवाडा तलाव ते मानकापूर दहन घाट
- मानकापूर दहन घाट ते कामठी रोड पुलिया
- कामठी रोड पुलिया ते जुनी कामठी रोड पुलिया
- जुनी कामठी रोड पुलिया ते पूनापूर (भरतवाडा झ्र नाग व पिवळी नदी संगम)
...
पोहरा नदी
- सहकारनगर ते नरेंद्रनगर पुलिया
- नरेंद्रनगर ते पिपळा फाटा
- पिपळा फाटा ते नरसाळा विहीरगाव