दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा : प्रवीण दटके यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:52 AM2019-02-07T00:52:27+5:302019-02-07T00:54:12+5:30

शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे अखेरचे पॅकेज वगळता इतर सर्व कामे १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. पूर्ण झालेल्या रस्त्यावरील लहानसहान कामे पूर्ण करून धूळ स्वच्छ करण्यात यावी. डिव्हायडरची रंगरंगोटी आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी, पी.पी.पी., केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता गठित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी दिले.

Complete the second phase of cement road before September 15: Pravin Datke's directions | दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा : प्रवीण दटके यांचे निर्देश

दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा : प्रवीण दटके यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देविविध प्रकल्पांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे अखेरचे पॅकेज वगळता इतर सर्व कामे १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. पूर्ण झालेल्या रस्त्यावरील लहानसहान कामे पूर्ण करून धूळ स्वच्छ करण्यात यावी. डिव्हायडरची रंगरंगोटी आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी, पी.पी.पी., केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता गठित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी दिले.
महापालिका मुख्यालयातील सभागृहात आयोजित समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सत्तापक्ष नेते सदस्य संदीप जोशी, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, सतीश नेरळ, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे उपस्थित होते.
अजनी रेल्वे स्टेशन पूल आणि वर्धा रस्त्याला जोडणाऱ्या डी.पी. रस्त्याचे लोकार्पण २२ फेब्रुवारीला होत असल्याने उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करा, मच्छिसाथ, तीन नल चौक, बुधवारी येथील मटन मार्केट प्रकल्पांचे लोकार्पण २२ फेब्रुवारीला होत आहे.त्यादृष्टीने तयारी करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. नागनदी प्रकल्पासाठी जिकाने अर्थसाहाय्य देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याबाबतचा सुधारित प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येईल, अशी माहिती तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांनी दिली. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन करा. नाईक तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागरचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.
शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये अनुभवी आरोग्य निरीक्षकांची मते घेण्यात यावीत. त्यांच्या अनुभवाच्या आधारे स्कोप ऑफ वर्कमध्ये आवश्यक ते फेरबदल करण्यात यावे. निविदेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, शहरात एलईडी लाईट लावण्याचे काम मे २०१९ पर्यंत पूर्ण करा, त्यानुसार महिनानिहाय अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्मार्ट सिटी प्रकल्पातील काही प्रश्नांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली आणि आवश्यक ते निर्देश दिले. बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त, आरोग्य निरीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कार्यवाही अहवाल सादर करा
सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट, घनकचरा व्यवस्थापन, महाल बुधवार बाजार, सक्करदरा बुधवार बाजार, कमाल टॉकीज जवळील बाजार, महाल येथील मासोळी बाजार, केळीबाग रोड, गड्डीगोदाम येथील रस्ता, पारडी येथील रस्त्यासंदर्भातील कार्यवाहीची सद्यस्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. पुढील बैठकीत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रवीण दटके यांनी यावेळी दिले.

 

Web Title: Complete the second phase of cement road before September 15: Pravin Datke's directions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.