डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; आणखी वर्षभराचा कालावधी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:30 AM2021-06-02T08:30:41+5:302021-06-02T08:32:24+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२,३०,७५३ आहे. त्यानुसार २०२२ संपेपर्यंत लसीकरण सुरू ठेवावे लागणार आहे.

Complete vaccination by December is difficult; It will take another year | डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; आणखी वर्षभराचा कालावधी लागणार

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; आणखी वर्षभराचा कालावधी लागणार

Next
ठळक मुद्देसध्या रोज ३६८७ लसीकरणवर्षअखेरपर्यंत १८,८८,३५० लोकांनाच मिळेल लस

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे; परंतु लसीच्या तुटवड्यामुळे नागपूर जिल्ह्यातील दैनंदिन लसीकरण, ३१ मेनुसार ३६८७ वर आले आहे. त्यानुसार आठवड्याला जवळपास २५,८०९, महिन्याला १,१०,६१० तर पुढील सहा महिन्यांत म्हणजे डिसेंबर २०२१पर्यंत ६,६३,६६० लोकांचे लसीकरण होईल. यात ३० मेपर्यंत १२,२४,६९० लसीकरण झालेल्या लोकांची संख्या जोडली तरी ती १८,८८,३५० होते. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२,३०,७५३ आहे. त्यानुसार २०२२ संपेपर्यंत लसीकरण सुरू ठेवावे लागणार आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिल्या लाटेचा कहर ओसरताच १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. १ एप्रिलपासून चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आल्याने लसीकरणाचा वेग वाढला. १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू झाल्याने रोज साधारण १५ ते २० हजारांदरम्यान लसीकरण होत होते; परंतु त्यातुलनेत लसीचा साठा कमी पडला. खासगी हॉस्पिटलमधील केंद्रे बंद करण्यात आली. सोबतच १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरणही थांबविण्यात आले. यातच कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचा कालावधी १२ ते १६ आठवड्यांपर्यंत लांबविण्यात आल्याने केंद्रावरील गर्दीच नाहीशी झाली. ३१ मे रोजी नागपूर जिल्ह्यातील जवळपास २५० वर केंद्रांवर केवळ ३,६८७ लसीकरण झाले. याच संख्येने लस दिल्यास या वर्षअखेरपर्यंत केवळ १८,८८,३५० लोकांचे लसीकरण होईल आणि २३ लाखांवर लोक शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

::२९ मेपर्यंत झालेले लसीकरण

वयोगट : पहिला डोस : दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी :६४२५७: ३३९३७            

फ्रंटलाइन : ११३१२० :३४५६७ :

ज्येष्ठ नागरिक : ३३७८९३:११९९०६

४५ते ६० वयोगट :४२४७८७ : ७८०७८

१८ ते ४४: १८१४५ :००००

:: १८ पेक्षा कमी आणि जास्त वयाचे काय?

१८ वर्षांपेक्षा कमी वयोगट असलेल्या मुलांसाठी अद्यापही कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. मात्र, या वयोगटात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यात ती सुरू होण्याचे संकेत आहेत. १८ वर्षांवरील लसीकरण थांबविण्यात आले आहे. आवश्यक लसींचा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण सुरू होईल, असे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, नागपुरात खासगी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात १८ वर्षांवरील वयोगटाचा समावेश असल्याने गर्दी उसळली आहे.

-डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण करण्याचा प्रयत्न

महानगरपालिकेची १००वर लसीकरण केंद्रे आहेत. यापेक्षा जास्त खासगी हॉस्पिटल व खासगी संस्थांमध्ये लसीकरण केंद्रे आहेत. सध्या ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू असल्याने गती मंदावल्याचे दिसून येते; परंतु जेव्हा राज्याकडून १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू होईल, तेव्हा गती वाढेल. या डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त मनपा

Web Title: Complete vaccination by December is difficult; It will take another year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.