नागपुरातील घाट रोडचे काम सात दिवसांत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:30 PM2019-06-27T23:30:16+5:302019-06-27T23:31:08+5:30

बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम सात दिवसांत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देतानाच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाच महिन्यांपासून इमामवाडा-डालडा फॅक्टरी-घाट रोडदरम्यान रखडलेल्या कामासाठी कंत्राटदाराला अल्टीमेटम दिला.

Complete the work of Ghat Road in Nagpur within seven days | नागपुरातील घाट रोडचे काम सात दिवसांत पूर्ण करा

नागपुरातील घाट रोडचे काम सात दिवसांत पूर्ण करा

Next
ठळक मुद्दे कार्यकारी महापौरांचे आदेश : कंत्राटदारालाही अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम सात दिवसांत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देतानाच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाच महिन्यांपासून इमामवाडा-डालडा फॅक्टरी-घाट रोडदरम्यान रखडलेल्या कामासाठी कंत्राटदाराला अल्टीमेटम दिला.
पार्डीकर आणि पोहाणे यांनी या दोन्ही रस्त्यांची गुरुवारी पाहणी केली. प्रारंभी बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याचे काम मुख्यमंत्री निधीतून होत असून गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी रस्त्याच्या कामाची माहिती देत कामात येणारे अडथळे सांगितले. काही अडचण आल्यास पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात यावी. उर्वरित कामास सोमवारी सुरुवात करून गुरुवारपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश पार्डीकर यांनी दिले.
यानंतर इमामवाडा-डालडा फॅक्टरी-ग्रेट नाग रोड-आयसोलेशन हॉस्पिटलदरम्यानच्या रस्त्याचीही पाहणी करण्यात आली. संबंधित काम जे.पी. एंटरप्राईजेसकडे असल्याची माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. यावेळी परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या अर्धवट बांधकामामुळे येत असलेल्या समस्याही त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून जाणून घेतल्या. यावेळी पोहाणे यांनी कंत्राटदाराशी मोबाईलवरून संपर्क साधत कामासंदर्भात अल्टीमेटम दिला. पाच महिन्यांपासून काम रखडले असून जर कंत्राटातील अटी व नियमांचे पालन झाले नाही तर देयके थांबविण्यात येतील, असा अल्टीमेटम त्यांनी दिला. या दोन्ही कामांचा पाठपुरावा आपण स्वत: करणार असून तातडीने हे बांधकाम पूर्ण करण्यात यावे आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.

Web Title: Complete the work of Ghat Road in Nagpur within seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.