विधी विद्यापीठाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:09 AM2021-02-07T04:09:16+5:302021-02-07T04:09:16+5:30

नागपूर : निर्माणाधीन असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कार्याला गती देऊन ३१ मार्चपर्यंत येथील कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री ...

Complete the work of Law University by March 31 () | विधी विद्यापीठाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा ()

विधी विद्यापीठाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा ()

googlenewsNext

नागपूर : निर्माणाधीन असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कार्याला गती देऊन ३१ मार्चपर्यंत येथील कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा राऊत यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी निर्माणाधीन प्रशासकीय तसेच शैक्षणिक इमारत, ग्रंथालय, मुला-मुलींचे वसतिगृह यांची प्रत्यक्ष पाहणी केली.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंदर कुमार, विशेष कर्तव्य अधिकारी प्रा. चामर्ती रमेश कुमार, कुलसचिव आशिष दीक्षित, सहायक कुलसचिव प्रा. सोपान शिंदे, डॉ. रंगास्वामी स्टॅलिन, विद्यापीठाचे सल्लागार वास्तुशास्त्रज्ञ परमजित अहुजा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, प्रफुल्ल लांडे, मनीष पाटील, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपुरे, संपर्क अधिकारी रमेश मानापुरे आदी यावेळी उपस्थित होते.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विधी विद्यापीठाच्या विद्युत पुरवठ्यासंबंधित निविदाविषयक कामे तातडीने हाती घ्यावीत, तसेच येथील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण १० एप्रिल रोजी करण्याचे नियोजन आहे. याबाबत समन्वय समिती गठित करून प्रत्येक कामाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाच्या प्रगतीचा दर आठवड्याला आढावा घेऊन यासंबंधी अहवाल संबंधितांना पाठवावा, असे निर्देश राऊत यांनी यावेळी दिले.

Web Title: Complete the work of Law University by March 31 ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.