प्रबोधनात्मक नाटकांची संमिश्र अनुभूती
By admin | Published: January 1, 2015 01:26 AM2015-01-01T01:26:07+5:302015-01-01T01:26:07+5:30
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. यात मिठू मिठू पोपट, ताई, घरटं व आई पाहिजे नाटकांचा समावेश होता.
बालनाट्य स्पर्धा : चार नाटकांचे सादरीकरण
नागपूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. यात मिठू मिठू पोपट, ताई, घरटं व आई पाहिजे नाटकांचा समावेश होता. या नाटकांचे विषय काहीसे प्रबोधनात्मक तर, काहीसे रंजनात्मक स्वरुपाचे होते.
ताईने रसिकांना जिंकले
स्व. दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे आयोजित ताई हे नाटक मुंशी प्रेमचंद यांच्या नाटकाचे मराठी रूपांतर होते. या नाटकातून कलावंतांनी शाळेतील अभ्यास व खेळ यांच्या संतुलित मेळाने मिळणाऱ्या यशाचे व आनंदाचे महत्त्व पटवून दिले. यात सलोनी वंजारी, प्राची चौधरी, रेवेंद्रसिंह तोमर, वेदांत नाईक, करण कावळे, आदित्य गिरी व भूषण आसरे हे कलावंत सहभागी होते. विजय पवार, शीतल राठोड, शिवा शेंडे, अमित शेंडे यांचा तांत्रिक सहभाग होता.
भावनांचे महत्त्व सांगणारे ‘घरटं’
स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल नंदनवन सादरीत ‘घरटं’ या नाटकात मध्यमवर्गीय कुटुंबातील आई-वडील व मुलांमधील सामंजस्यपूर्ण संतुलित संबंधावर भर देण्यात आला. रोशन नंदवंशी लिखित या प्रयोगाचे दिग्दर्शन अनुप्रिता गभणे यांनी केले. यात आकांक्षा पुरी, सेजल जुनघरे, आयुष बालपांडे, देवांश तिडके, आकांक्षा गोनाडे, तनिष्क निंबाळकर, हर्षिका गोनाडे हे कलावंत सहभागी झाले होते.
आईची महती ‘आई पाहिजे’
स्वानंद सांस्कृतिक मंडळ आयोजित ‘आई पाहिजे’ या नाटकातून समाजातील कन्या जन्माला विरोध करणाऱ्यांना कन्या जन्माचे महत्त्व व स्वागताचा संदेश देण्यात आला. नाटकाचे लेखन रवि धारणे यांनी केले. हेमलता धारणे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. नाटकात स्नेहल लाखे, कोमल मांदाडे, पारुल मोहरील, सानिका लाखे, गौरव चौधरी, तन्वी मोहरील, सलोदी दुर्गे हे कलावंत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
मिठू मिठू पोपटला दाद
स्व. भाऊरावजी बकाणे शिक्षण संस्था देवळीद्वारा संचालित व सेंट जॉन हायस्कूल पुलगावतर्फे सादर करण्यात आलेल्या मिठू मिठू पोपट या नाटकातून शालेय अभ्यासक्रमातील पाठ्य पुस्तकांची केवळ घोकंपट्टी करून परीक्षेला सामोरे जाणाऱ्या शिक्षणप्रणालीवर टीका करण्यात आली. अशा पोपटपंचीने विद्यार्थ्यांची बुद्धी, संशोधन व कल्पकतेचा ऱ्हास करणाऱ्या दृश्यपरिणामांचा वेध घेणारे हे संस्कारक्षम नाटक होते. डॉ. सतीश साळुंखे लिखित व दीपक फुसाटे दिग्दर्शित नाटकात असित फुसाटे, आल्हाद भोयर, संकेत बाभळे, प्रेरणा थुल, सांची ओरके, विवेक मडवे, लोकेश वाघमारे, धिरज जाधव, लेखा दिघेकर, मिनल दीक्षित, समीक्षा देशमुख, देवेश बढिये, स्मित सावरकर, सृजल चापके, रिया बुल्हे यांनी अभिनय केला.