नागपुरात कॉम्प्युटर व मोबाईल दुरुस्ती दुकाने सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:57 AM2020-05-18T10:57:45+5:302020-05-18T10:58:08+5:30
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत चौथे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी याबाबत आदेश जारी केला. मात्र यात कॉम्प्युटर-मोबाईल दुुरुस्ती व होम अप्लायन्सेसची दुकाने सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत चौथे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यानुसार नागपूर शहरातही लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी याबाबत आदेश जारी केला. मात्र यात कॉम्प्युटर-मोबाईल दुुरुस्ती व होम अप्लायन्सेसची दुकाने सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.
शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आयुक्तांनी यापूर्वी १४ मे रोजी काढलेल्या आदेशान्वये नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याला परवानगी दिली आहे. आधीच्या आदेशानुसार असलेल्या सवलती व निर्बंध कायम आहेत. शहरात कोविडची स्थिती लक्षात घेता संबंधित शिथिलता देण्याबाबत टप्प्याटप्प्याने पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुज्ञेय केलेल्या शिथिलतेबाबत नव्याने कोणतीही परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एस.ओ.पी. चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दुकाने सुरू राहण्याचे वार
इलेक्ट्रीकल्स साहित्य सोमवार, बुधवार, शुक्रवार
कॉम्प्युटर व मोबाईल रिपेअरिंग सोमवार, बुधवार, शुक्रवार
होम अप्लायन्सेस सोमवार, बुधवार, शुक्रवार
हार्डवेअर व बिल्डींग मटेरिअल सोमवार, बुधवार, शुक्रवार
ऑटो स्पेअर व रिपेअर शनिवार, मंगळवार, गुरुवार
टायर, ऑईल शनिवार, मंगळवार, गुरुवार
ऑप्टिकल्स शनिवार, मंगळवार, गुरुवार
होजियरी शनिवार, मंगळवार, गुरुवार