संगणक परिचालक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:19+5:302021-06-17T04:07:19+5:30
मौदा : घरकुल योजनेसाठी मंजूर झालेला निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्याच्या बदल्यात हजार रुपयाचा मोबदला मागणाऱ्या संगणक परिचालकास लाचलुचपत ...
मौदा : घरकुल योजनेसाठी मंजूर झालेला निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्याच्या बदल्यात हजार रुपयाचा मोबदला मागणाऱ्या संगणक परिचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. विलास देवराव उकंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मौदा पंचायत समिती येथे संगणक परिचालक म्हणून कार्यरत आहे. यातील तक्रारकर्त्याचे घरकुल मंजूर झाले आहे. यासाठी मंजूर झालेला ३० हजार रुपयांचा निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात आरोपीने हजार रुपयाचा मोबदला मागितला होता. याबाबतची तक्रार लाभार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. बुधवारी सापळा रुचून एसबीच्या भंडारा येथील पथकाने संगणक परिचालकास लाच स्वीकारताना पकडले. याप्रकरणी मौदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.