अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना राज्यात राबविणार

By admin | Published: January 11, 2015 12:51 AM2015-01-11T00:51:28+5:302015-01-11T00:51:28+5:30

अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना महाराष्ट्रात राबविण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज शनिवारी केली. झाशी राणी चौकात रोटरी क्लब आॅफ नागपूर एलिट,

The concept will be implemented in the state of the accident | अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना राज्यात राबविणार

अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना राज्यात राबविणार

Next

परिवहन मंत्र्यांची घोषणा : अपघातमुक्त नागपूर अभियानाचा शुभारंभ
नागपूर : अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना महाराष्ट्रात राबविण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज शनिवारी केली. झाशी राणी चौकात रोटरी क्लब आॅफ नागपूर एलिट, वोक्हार्ट हॉस्पिटल व जीवन सुरक्षा प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अपघातमुक्त नागपूर अभियानाचा शुभारंभ दिवाकर रावते यांनी केला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) शरद जिचकार, सामाजिक कार्यकर्ता संजय मेश्राम, रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पाठक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, रवंीद्र भुयार, पंकज वैशंपायन, राजू वाघ, प्रसिद्ध व्यावसायिक आशुतोष शेवाळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अपघातामुळे जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी पडते म्हणून जगातील सर्व देशात व भारतातील सर्व राज्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याचा निर्णय युनो संघटनेने घेतला, अशी माहिती देत परिवहन मंत्र्यांनी यावेळी अपघात टाळण्यासाठी सामाजिक संघटनांनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
पाठक यांनी अपघातमुक्त नागपूर अभियानाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, नागपुरात गेल्या वर्षभरात १३०० वर अपघाताची नोंद झाली आहे. यामुळे हे अभियान वर्षभर राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले. शेळके यांनी ११ जानेवारीपासून राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले, परिवहन विभागातर्फेवाहनचालकांना वाहन चालविण्याचा परवाना दिल्यानंतरही त्यांना रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत गेल्या वर्षभरात ३५ हजार वाहनचालकांना याचे प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वाहतूक नियमांच्या माहिती देणाऱ्या पत्रकाचे प्रकाशन परिवहन मंत्र्यांनी केले. आज देण्यात आलेली शपथ एका मोठ्या फलकावर लिहिण्यात आली होती. त्यावर परिवहन मंत्र्यासह मान्यवरांनी स्वाक्षरी केली. संचालन रोटरीचे सचिव जयंत दीक्षित यांनी केले. कार्यक्रमाला सहायक मोटार वाहन निरीक्षक सुबोध देशपांडे, राजेश निकोसे, मोटार वाहन निरीक्षक विजय सोळसे, संजय फेंडारकर, नीलेश लोखंडे, प्रकल्प संयोजक निशांत बिर्ला, प्रशांत पिपळवार, श्रीनिवास वरंमे, ललित लोया, डॉ. वंदना टोमे, शरद बागडी, प्रमोद तभाने, अमित हाजियानी, धनंजय कोंडावार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The concept will be implemented in the state of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.