श्रीमद्भागवत कथेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:11 AM2021-02-21T04:11:33+5:302021-02-21T04:11:33+5:30
मेंढला : गावालतगच्या सूर्यनारायण पारीवर श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले हाेते. रथसप्तमीनिमित्त शुक्रवारी (दि. १९) काल्याचे कीर्तन व ...
मेंढला : गावालतगच्या सूर्यनारायण पारीवर श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले हाेते. रथसप्तमीनिमित्त शुक्रवारी (दि. १९) काल्याचे कीर्तन व महाप्रसादाच्या वितरणाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली.
श्री सूर्यनारायणाच्या छाेट्या मंदिरामुळे या डाेंगराला पंचक्राेशीत सूर्यनारायणची पारी या नावाने ओळखले जाते. या पारीवर दरवर्षी पाैष महिन्यातील प्रत्येक रविवारी धार्मिक कार्यक्रमाचे आयाेजन केले जाते. या पाैष मासाची सांगता रथसप्तमीला केली जाते. यावर्षीही श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले हाेते. रथसप्तमीला (शुक्रवारी, दि. १९) या सप्ताहाची सांगता करण्यात आली. नारायण पडाेळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण आले. मेंढला, वाढाेणा, रामठी, सिंजर, वडविहिरा येथील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमात काेराेना उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्यात आले हाेते.