सुमित नगराळेला सशर्त जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:07 AM2021-07-17T04:07:21+5:302021-07-17T04:07:21+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आनंद साई नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्यात आरोपी असलेले दक्षयानी ग्रुपचे ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आनंद साई नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्यात आरोपी असलेले दक्षयानी ग्रुपचे भागीदार सुमित मुकुंद नगराळे यांना सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.
हुडकेश्वर पोलिसांनी लेखा परीक्षक अशोक राठोड यांच्या तक्रारीवरून या घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब व एमपीआयडी कायद्यातील कलम ३ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दक्षयानी ग्रुपने या पतसंस्थेला आठ कोटी रुपयाची गुंतवणूक आणून देण्यासाठी करार केला होता. नगराळे यांनी त्यापोटी पतसंस्थेकडून आठ लाख रुपये स्वीकारले होते. त्यानंतर ग्रुपने संबंधित गुंतवणूक आणून दिली नाही व पतसंस्थेचे आठ लाख रुपयेही परत केले नाही असा आरोप आहे. नगराळेतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.