नीट घाेटाळ्याची न्यायालयीन चाैकशी करा; स्टुडंट्स फेडरेशनचे तीव्र प्रदर्शन
By निशांत वानखेडे | Published: June 12, 2024 07:35 PM2024-06-12T19:35:35+5:302024-06-12T19:36:47+5:30
या घाेटाळ्याची न्यायालयीन चाैकशी करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने केली.
नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या नीट निकालात समाेर आलेला गैरप्रकार हा माेठ्या भ्रष्टाचाराचा संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे या घाेटाळ्याची न्यायालयीन चाैकशी करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) ने करण्यात आली.
फेडरेशनच्या वतीने शहरातील व्हेरायटी चौकात नीट निकालाविराेधात आंदोलन करण्यात आले. एआयएसएफचे राज्यसचिव कॉ. वैभव चोपकर यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन झाले. नीटच्या परीक्षेत एकाच केंद्रातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवले, पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचे आसन क्रमांक एकाच क्रमाने आहेत. निकालामधील मिळालेल्या गुणांसह इतरही अनेक गाेष्टी आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे यात माेठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय येताे. त्यामुळे नीट परीक्षा रद्द करून गैरप्रकाराची न्यायालयीन चाैकशी करावी, अशी मागणी चाेपकर यांनी केली. नीट परीक्षेचे सध्याचे मॉडेल वैद्यकीय शाखेत जाण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक दडपण आणते, परिणामी वेदनादायक घटना होतात. परीक्षेच्या तयारीच्या वाढत्या खर्चामुळे पालकांवर पडत असलेला आर्थिक दबाव देखील गंभीर चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.
आंदाेलनात रिदम काळे, संघर्षशील गजभिये, अनुराग पवार, तन्नू बोरकर, मयुरी चव्हाण, सुजिता चौधरी, आश्विन डांगे, पाैर्णिमा घरत, गायत्री कन्नके, भाग्यश्री धारणे, लक्ष्मी जोधे, कल्यानी किरनाके, सुजाता मेश्राम, संजना मोटघरे, काजल तांबे, पल्लवी तांबे, निशा उईके, मुक्ता उईके, पूजा वासनिक, श्रुती उईके आदींचा सहभाग हाेता.