मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 09:56 PM2020-04-17T21:56:44+5:302020-04-17T21:57:43+5:30

तोंडावर मास्क न लावता सर्वत्र बिनबोभाट फिरणाऱ्या बेजबाबदार आणि उपद्रवी मंडळींवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावावा, अशी मागणी होत आहे.

Conduct a vigorous campaign against those who do not wear masks | मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवा

मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवा

Next
ठळक मुद्देपोलिसांनी कारवाई वाढवावी : ‘कोरोना’ला नियंत्रणात आणणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोंडावर मास्क न लावता सर्वत्र बिनबोभाट फिरणाऱ्या बेजबाबदार आणि उपद्रवी मंडळींवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाने सर्वत्र प्रचंड थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या सारखी वाढतच आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे. सरकार, प्रशासन वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आणि पोलीस आपापल्या परीने कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जनजागरणही केले जात आहे. तोंडावर मास्क लावा, वेळोवेळी साबणाने हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना दिल्या जात आहे. बहुतांश मंडळी या सूचनांचे काटेकोर पालनही करीत आहे. मात्र काही बेजबाबदार मंडळी या सूचनांकडे दुर्लक्ष करून स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासोबतच इतरांचेही आरोग्य धोक्यात आणू पाहत आहेत.
नागपुरात वेगवेगळ्या भागात तोंडावर मास्क न लावता फिरणारे उपद्रवी मोठ्या प्रमाणात दिसतात. पोलिसांनी या बेजबाबदारांविरुद्ध आता धडाकेबाज कारवाई करावी आणि कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव रोखावा, अशी संतप्त मागणी जनसामान्यातून पुढे आली आहे. दरम्यान मास्क न लावता बिनबोभाट अनेक जण फिरत असल्याची बाब लक्षात आणून दिली असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Conduct a vigorous campaign against those who do not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.