आपत्ती व्यवस्थापनावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:08 AM2021-05-22T04:08:31+5:302021-05-22T04:08:31+5:30
नागपूर - गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या वतीने २६ ते २८ मेदरम्यान आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती जोखीम कपात ...
नागपूर - गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या वतीने २६ ते २८ मेदरम्यान आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती जोखीम कपात या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण व विद्याशाखा विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जबाबदारी नागपूरच्या दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. एनआयडीएमचे कार्यकारी संचालक मेजर जनरल मनोज कुमार बिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष एच.आर. बाखरू २६ मे रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन करतील. पहिल्या दिवशी एनआयडीएमच्या ईसीडीआरएम विभागाचे प्रमुख प्रा. अनिल गुप्ता, सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी आणि डॉ. आय.पी. केसवानी, डॉ. एस. व्ही. कासबेकर, नीरज बाखरू यांची भाषणे होतील. तांत्रिक सत्रामध्ये एकूण १० महत्त्वपूर्ण विषयांवरील तज्ज्ञांचे व्याख्यान असतील. तीन दिवस विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, अशी माहिती कार्यक्रम संयोजक नवीन अग्रवाल यांनी दिली आहे.