विद्यार्थ्यांच्या ‘अपार’ आयडी वरून पालकांमध्ये संभ्रम; पत्ता बदल, गाेपनीयतेच्या इशाऱ्याने वाढला संशय

By निशांत वानखेडे | Published: November 18, 2024 05:30 PM2024-11-18T17:30:45+5:302024-11-18T17:31:56+5:30

Nagpur : पालकांचेही आधार कार्ड जाेडण्याची सुचना

Confusion among parents over students' 'Apar' IDs; Suspicion raised by change of address, privacy notice | विद्यार्थ्यांच्या ‘अपार’ आयडी वरून पालकांमध्ये संभ्रम; पत्ता बदल, गाेपनीयतेच्या इशाऱ्याने वाढला संशय

Confusion among parents over students' 'Apar' IDs; Suspicion raised by change of address, privacy notice

नागपूर : शासनातर्फे सर्व विद्यार्थ्यांचा ‘अपार आयडी’ तयार करण्याच्या सुचनेवरून सध्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामध्ये अपार कार्ड बनल्यानंतर पत्त्यात बदल करता येणार नाही आणि पालकांच्या माहिती बद्दल गाेपनीयता राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानेच पालकांचा संशय वाढविला आहे.
विद्यार्थ्यांसाठी ‘अपार आयडी’ तयार करायची असल्याचा संदेश शाळांकडून पालकांच्या माेबाईलमध्ये पडला आहे. त्यानुसार या आयडीमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आपली सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवता येतील, असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा हा आयडी बनवण्याकरिता आई आणि वडील अशा दाेन्ही पालकांचे आधार कार्ड शाळेत सादर करणे अनिवार्य असल्याची सुचना आहे. हा केंद्र शासनाचा प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यापुढे दिलेल्या इशाऱ्याने पालक संभ्रमात पडले आहेत.

या संदेशानुसार अपार आयडी बनल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. विद्यार्थ्याचे नाव, पालकांचे नाव, पत्ता आदीमध्ये कोणताही बदल भविष्यात करता येणार नाही. नाव बदलणार नाही, हे ठिक आहे, पण पत्ता बदलता येणार नाही, या सुचनेने पालकांची चिंता वाढली आहे. अनेक पालक राेजगार किंवा नाेकरीच्या कारणाने वेगळ्या शहरात भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या आधार कार्डवर त्याच घराचा पत्ता असताे. पालकांची बदली झाल्यानंतर किंवा घर बदलल्यानंतर त्यानुसार आधार कार्ड अपडेट करावा लागताे. त्यामुळे पत्ता कायमस्वरुपी कसा राहिल, असा सवाल पालकांच्या मनात आहे.

यातील दुसरा इशारा गाेपनीयतेशी संबंधित आहे. पालकांची आधार कार्ड बद्दलची माहिती गोपनीय राहणार नाही, अशी शक्यता असल्याचे संदेशात म्हटले आहे. यासाठी पालकांची संमती अनिवार्य आहे. त्यानुसार सोबत पाठवलेल्या फॉर्ममध्ये अपार आयडीचे संमती पत्र दिलेले आहे. त्यातील एक प्रत पालकांनी प्रिंट काढून भरावी व संमतीपत्र भरावे, अशी सुचना करण्यात आली आहे. माहिती गाेपनीय राहणार नसल्याचा इशारा दिल्याने पालकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. अनेक पालकांनी याबाबत शाळांकडे विचारणा केली असून शिक्षकांकडे याचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार किंवा शालेय शिक्षण विभागाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

"अपार आयडी ही सुरुवात आहे. यावर पुढे आक्षेप आल्यास पत्त्याबाबत नव्याने बदल करता येईल. हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्यानुसार विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणाला गेल्यास त्याचा संपूर्ण पूर्व शैक्षणिक इतिहास एका क्लिकवर पाहता येईल. त्यानुसार गाेपनीयतेच्या सुचनेबाबतही काळजी करण्यासारखे काही नाही."
- राेहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, नागपूर

Web Title: Confusion among parents over students' 'Apar' IDs; Suspicion raised by change of address, privacy notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर