दहावीच्या निकालासंदर्भात समाजमाध्यमांवरील तारखांमुळे संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:50 AM2020-06-16T00:50:55+5:302020-06-16T00:52:43+5:30
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा बोर्डाकडून अद्याप जाहीर झालेल्या नाही. असे असतानाही समाजमाध्यमांवरून या निकालाच्या तारखा जाहीर होत असल्याने पालक आणि विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचे बोर्डाने एका पत्रकातून कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा बोर्डाकडून अद्याप जाहीर झालेल्या नाही. असे असतानाही समाजमाध्यमांवरून या निकालाच्या तारखा जाहीर होत असल्याने पालक आणि विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचे बोर्डाने एका पत्रकातून कळविले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेबु्रवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आल्या होत्या. दरम्यान, दहावीची परीक्षा सुरू असताना कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे भूगोल विषयाचा पेपर लांबला; नंतर तो रद्द होऊन गुणदान कसे करायचे, हे सुद्धा बोर्डाने स्पष्ट केले.
कोरोनामुळे निकाल लांबत चालल्याने व्द्यिार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. अशातच अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे किंवा वेगळ्या विद्याशाखेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाची या विलंबामुळे घालमेल सुरू आहे. निकाल कधी लागणार, हे अद्यापही स्पष्ट नाही. मात्र समाजमाध्यमांवरून निकालाच्या तारखा परस्पर जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे बराच संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, बोर्डाने यासंदर्भात एक पत्रक प्रकाशित करून, अद्याप तारखा जाहीर झाल्या नसल्याचे कळविले आहे. यासंदर्भात बोर्डाचा निर्णय झाल्यावर तसे अधिकृतपणे जाहीर केले जाणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.