रेल्वेच्या पेपरमध्ये गोंधळ, ११ ची वेळ असताना १ वाजेपर्यंत परीक्षाच घेतली नाही 

By आनंद डेकाटे | Published: April 20, 2023 04:12 PM2023-04-20T16:12:00+5:302023-04-20T16:12:22+5:30

ऑनलाईन परीक्षा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी

Confusion in Railway Papers, exam not conducted till 1 o'clock when it was 11 o'clock | रेल्वेच्या पेपरमध्ये गोंधळ, ११ ची वेळ असताना १ वाजेपर्यंत परीक्षाच घेतली नाही 

रेल्वेच्या पेपरमध्ये गोंधळ, ११ ची वेळ असताना १ वाजेपर्यंत परीक्षाच घेतली नाही 

googlenewsNext

नागपूर :रेल्वे विभागातील अभियांत्रिकी पदासाठी गुरुवारी नागपुरातील परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ झाला. पेपरसाठी सकाळी ११ ची वेळ होती. उमेदवार १०.३० वाजताच पोहोचले होते. परंतु दुपारी १ वाजतापर्यंत विद्यार्थ्यांना पेपरच देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

रेल्वे विभागाच्या अभियांत्रिकी पदासाठी सकाळी ११ वाजता ऑफलाईन माध्यमातून परीक्षा घेण्यात येणार होती. यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थी केंद्रावर पोहोचले मात्र दुपारी १२ वाजतापर्यंत विद्यार्थ्यांना पेपेरच देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

अजनी रेल्वे येथील शाळेमध्ये परीक्षेचे केंद्र होते. १ वाजतापर्यंत परीक्षा न झाल्याने शेवटी विद्यार्थ्यांनी गोंधळ केला. रेल्वे अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत पेपर रद्द करा आणि नव्याने ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेण्याची मागणी केली. सेंटरवर पेपर आला नसल्याने हा पेपरच रद्द करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Web Title: Confusion in Railway Papers, exam not conducted till 1 o'clock when it was 11 o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.