दिशा सालियानवरुन गोंधळ, राणेनंतर राणाही आक्रमक, आदित्य ठाकरे निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 02:55 PM2022-12-22T14:55:24+5:302022-12-22T14:56:28+5:30

दिशा सालियान हत्या प्रकरण सभागृहात मांडल्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

Confusion over Disha Saliyan in nagpur assembly, Rana after Rana is also aggressive, Aditya Thackeray on target | दिशा सालियानवरुन गोंधळ, राणेनंतर राणाही आक्रमक, आदित्य ठाकरे निशाण्यावर

दिशा सालियानवरुन गोंधळ, राणेनंतर राणाही आक्रमक, आदित्य ठाकरे निशाण्यावर

Next

नागपूर - एकीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत थेट ठाकरे गटावर हल्ला चढवला. तर दुसरीकडे आता हिवाळी अधिवेशनात भाजपा-शिंदे गटाने दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आणत आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजपाचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर, आता अपक्ष आमदार रवि राणा यांनीही दिशा सालियानप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे, नागपूरमध्ये आजचा दिवस याच प्रकरणाने गाजला.    

दिशा सालियान हत्या प्रकरण सभागृहात मांडल्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विधानसभेचं कामकाज सुरुवातीला २० मिनिटे तर त्यानंतर १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे संसदेपाठोपाठ आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान प्रकरण गाजलं. तत्पूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाच्या आमदारांनी ये AU AU कोण है अशा प्रकाराचे बॅनर्स झळकावत आंदोलन केले होते. तर, आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली. आता, आमदार रवि राणा यांनीही नार्को टेस्टची मागणी केली आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या आणि दिशा सालियान प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांना वाचवण्याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचा गैरवापर केला. स्वतःच्या मुलाला वाचवण्याकरिता पुरावे नष्ट केले आहेत. या प्रकरणाची पुन्हा एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच माजी मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी, अशी मागणी रवि राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली होती. 

भरत गोगवलेंनीही उपस्थित केला मुद्दा

सभागृहात भरत गोगावले म्हणाले की, ९ जून २०२० ला दिशा सालियान युवतीचा संशयास्पद मृत्यू होणे. दिशाचा मृत्यू कुठल्या परिस्थितीत झाला? तपासात अद्याप निष्कर्षापासून पोहचले नाही. दिशा सालियान ही सुशांत सिंह राजपूतचे काम सांभाळत होती. त्या दोघांमध्ये झालेला फोन संवाद, व्हॉट्सअप चॅट उघड न होणे. दिशा मृत्यूनंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होणे. या मृत्यूचे गुढ उकललं नाही. या प्रकरणी सत्य बाहेर येणे गरजेचा आहे. दिशा सालियानचा मृत्यूवेळी तिच्यासोबत कोण कोण होते? हे समोर यायला हवा. दिशा सालियानच्या मृत्यूशी पूर्णपणे चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणी खुलासा होणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, दिशा सालियान प्रकरणावरुन आज विधानसभेत चांगलंच वादंग उठल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं असून दिशा सालियाप्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीला जोर धरला आहे. 
 

Web Title: Confusion over Disha Saliyan in nagpur assembly, Rana after Rana is also aggressive, Aditya Thackeray on target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.