विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत गोंधळ
By admin | Published: October 26, 2015 02:44 AM2015-10-26T02:44:20+5:302015-10-26T02:44:20+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व धर्मादाय उपआयुक्तांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत...
शिक्षक वैतागले : मतदान न करता परतले
नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व धर्मादाय उपआयुक्तांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत नियोजनच नसल्याने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. १८ हजार मतदारांसाठी केवळ ४ बुथवर मतदान घेण्यात आल्याने, मतदानासाठी शिक्षकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांचा त्रागा झाल्याने, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांशीही शिक्षकांच्या झटापटी झाल्या. त्यामुळे १ तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत संघटनेच्याच एका गटाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्टेटस्को दिला होता. ९ फेब्रुवारी २०१५ ला न्यायालयाने पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्देशानुसार धर्मादाय उपआयुक्तांनी २५ आॅक्टोबरला संघटनेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखला. त्यानुसार रविवारी धरमपेठ कन्या शाळेत मतदान घेण्यात आले. निवडणुकीत संपूर्ण विदर्भातून १८ हजार मतदार मतदान करणार होते. यासाठी धरमपेठ कन्या शाळेत चार बुथ ठेवण्यात आले होते. प्रत्येक बुथमध्ये प्रत्येकी तीन जिल्ह्यातील मतदारांचा समावेश करण्यात आला. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी दाखविलेल्या प्रतिसादामुळे मतदान प्रक्रियाच अडचणीत आली.