‘संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणार’, आज चित्र स्पष्ट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:20 AM2017-10-23T06:20:27+5:302017-10-23T06:20:40+5:30
९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. किशोर सानप यांनी स्वत:च्या विजयाबाबत पूर्ण खात्री व्यक्त केली आहे.
नागपूर : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. किशोर सानप यांनी स्वत:च्या विजयाबाबत पूर्ण खात्री व्यक्त केली आहे. मतदारांच्या दृष्टीने आपल्या चारही प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आपणच सरस असल्याचाही दावा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
‘मी तुकोबाचा अनुयायी आहे. माझे वाङ्मयीन योगदान साहित्य क्षेत्रापुढे आहे. त्या बळावरच मी मतांचा जोगवा मागत फिरत आहे. महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रील बहुसंख्य मतदारांचा मला पाठिंबा आहे. हा प्रतिसाद लक्षात घेता मी ही निवडणूक सहज जिंकेल, असा मला विश्वास आहे. पण दगाफटका घडलाच, तर माझा जय किंवा पराजय ५० मतांच्या फरकानेच होईल, असेही सानप म्हणाले.
>उमेदवारांनी अर्ज परत घेण्याची मुदत २३ आॅक्टोबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी संध्याकाळी ७ नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. ही यादी जाहीर झाल्यावरच संमेलनाध्यक्षपदाच्या लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.