काेराेना वाॅरियर्सचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:42+5:302021-09-22T04:09:42+5:30
उमरेड : कोरोना संकटकाळात अतिशय विपरीत परिस्थितीवर मात करणारे सोबतच कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या काेराेना वाॅरियर्सचा सत्कार शिवस्नेह ...
उमरेड : कोरोना संकटकाळात अतिशय विपरीत परिस्थितीवर मात करणारे सोबतच कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या काेराेना वाॅरियर्सचा सत्कार शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी मंचावर मंडळाचे सल्लागार सुधाकर खानोरकर, रूपचंद गोविंदानी, अशोक मने, अध्यक्ष प्रशांत जयस्वाल उपस्थित होते.
काेविड सेंटरमध्ये दोन वर्षे सेवा देणारे डॉ. विशाल सवाईमुल, स्वच्छता कर्मचारी खुशाल बानकर, कोरोना रुग्णांसाठी आपली वाहने प्रदान करणाऱ्या अनिकेत बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष माधुरी भिवगडे, संतोष महाजन तसेच कोरोनावर मात करणारे वेकोलि येथील दिलीप पटेल, प्रतिष्ठित व्यवसायी अशोक मने यांचा शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. कलाशिक्षक प्रेम चांदूरकर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. विकास खानोरकर, कैलास गाेविंदानी, प्रकाश गोविंदानी, संजय खानोरकर, मंदा मने, राखी जयस्वाल, अंकिता खानोरकर, सुनंदा शेंदरे, जया खानोरकर, संगीता लांजेवार आदींची उपस्थिती होती. रितेश मने, वैभव भिसे, डॉ. अनुप शेंदरे, क्षितिज खानोरकर, राजू ढेबुदास, गणेश मांढरे, अनिकेत खानोरकर, किरण ठाकरे, दत्तू हेडाऊ, दीपेश पटेल, अजिंक्य खानोरकर, निखिल कातुरे, सुजनसिंह गौतम, राजेश खांबाळकर, वैभव सहारे, कुंदन राऊत, सतीश तांबेकर, जॅकी गोविंदानी, गोलू जैसवानी, विक्की लधवे, सौरभ पटेल, आदित्य राहाटे, फाल्गुन ठक्कर, आयुष धाबेकर, कृष्णा मुंधडा आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय खानोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अभय लांजेवार यांनी केले. आभार प्रशांत जयस्वाल यांनी मानले.