काँग्रेसमध्येच ‘आक्रोश’ चंद्रपुरात आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:43 AM2017-11-01T01:43:57+5:302017-11-01T01:44:11+5:30

काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

In the Congress, 'Aakrash' in front of the moon face a face-to-face | काँग्रेसमध्येच ‘आक्रोश’ चंद्रपुरात आमने-सामने

काँग्रेसमध्येच ‘आक्रोश’ चंद्रपुरात आमने-सामने

Next
ठळक मुद्देपुगलिया व प्रदेश काँग्रेसचा एकाचवेळी वेगवेगळा मेळावा :

प्रदेशच्या रॅलीत चव्हाण तर पुगलियांच्या रॅलीत पाच माजी मंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. प्रदेश काँग्रेसने राज्य सरकार विरुद्ध संघर्षांचा बिगुल फुंकत ६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘विभागीय जनआक्रोश मेळावा’ आयोजित केला आहे तर तेथेच त्याच दिवशी, त्याच वेळी माजी खा. नरेश पुगलिया यांनी बाजूच्याच मैैदानावर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या बॅनरखाली शेतकरी व कामगार रॅली आयोजित केली आहे. तीत विदर्भातील ‘निष्ठावान’ असंतुष्ट नेत्यांना निमंत्रित केले आहे. आमने-सामने होत असलेल्या या दोन मेळाव्यांमुळे काँग्रेसमधील ‘आक्रोश’ प्रखरतेने चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.
विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी नागपुरात येत चंद्रपूरच्या मेळाव्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच सोमवारी पुगलिया यांनी पत्रकार परिषद घेत शेतकरी व कामगार रॅली घेत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर पुगलिया यांनी मंगळवारी नागपुरात येत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी नितीन राऊत, अनिस अहमद, माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आदींची भेट घेत या रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या वेळी या सर्व नेत्यांची सिव्हील लाईन्समधील चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर बैठक झाली. तीत पुढील कार्यक्रमांची रणनीती आखण्यात आली. बैठकीनंतर पुगलिया यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरातील संबंधित नेते मेळाव्याला येणार असून शिवाजीराव मोघे, वसंत पुरके हे देखील समर्थकांसह उपस्थित राहणार असल्याचा दावा केला. माजी खा. गेव्ह आवारी यांनी नागपुरातील संबंधित नेत्यांसह तीन हजार कार्यकर्ते चंद्रूपरच्या रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी यापूर्वीच प्रदेश काँग्रेसवर अविश्वास दाखवित ‘विदर्भ काँग्रेस’ स्थापन करण्याची मागणी हायकमांडकडे केली आहे.
अशोक चव्हाण ‘केअर टेकर’
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह प्रदेश पदाधिकारी हे सद्यस्थितीत ‘केअर टेकर’ आहेत. प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीनंतर सर्व अधिकार उपाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत. माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार व अनंतराव घारड यांच्या सल्ल्याप्रमाणे चव्हाण वागत आहेत. मी अ.भा. काँग्रेस समितीचा सदस्य आहे. असे असतानाही आपले नाव प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले नाही. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार चव्हाण यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४ प्रदेश प्रतिनिधींची नावे निश्चित केली. पक्षात बाहेरून आलेल्या व्यक्ती लुडबूड करीत आहेत.
- नरेश पुगलिया, माजी खासदार

Web Title: In the Congress, 'Aakrash' in front of the moon face a face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.