चंद्रपुरात धानोरकर तर रामटेकमध्ये किशोर गजभिये काँग्रेसचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:32 AM2019-03-25T10:32:30+5:302019-03-25T10:33:57+5:30

चंद्रपुरात शुक्रवारी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या नावाला कमालीचा विरोध झाला. हा विरोध पक्षश्रेष्ठींनी विचारात घेऊन धानोरकर यांच्या नावावर रविवारी सायंकाळी शिक्कामोर्तब केले.

Congress candidate from Chandrapur Dhanarkar and Ramtek Kishore Gajbhai for Congress | चंद्रपुरात धानोरकर तर रामटेकमध्ये किशोर गजभिये काँग्रेसचे उमेदवार

चंद्रपुरात धानोरकर तर रामटेकमध्ये किशोर गजभिये काँग्रेसचे उमेदवार

Next
ठळक मुद्देचुरस वाढलीचंद्रपुरात तिसऱ्यांदा बदलला उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपुरात शुक्रवारी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या नावाला कमालीचा विरोध झाला. हा विरोध पक्षश्रेष्ठींनी विचारात घेऊन धानोरकर यांच्या नावावर रविवारी सायंकाळी शिक्कामोर्तब केले. धानोरकरांच्या उमेदवारीने भाजपसमोर आता खऱ्या अर्थाने काँग्रेसने तगडे आव्हान उभे केल्याचेही बोलले जात आहे. या घडामोडींमुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघात आता चांगलीच चुरस बघायला मिळणार, असे चित्र आहे.
शिवसेना-भाजपची युती झाल्यापासूनच बाळू धानोरकर हे अस्वस्थ होते. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, अशी व्युहरचना काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी आखली होती. मात्र गटबाजीमुळे त्यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध झाला. परिणामी संभाव्य उमेदवार म्हणून नागपूरचे विशाल मुत्तेमवार यांचे पुढे आले होते. नागपूर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. यासोबतच बाहेरचा उमेदवार लादू नका, असा विरोधाचा सूर मतदार संघातून उमटला. यामुळे मुत्तेमवारांना माघार घेतली. यानंतर पुन्हा नव्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. अशातच माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब करून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा देखील केली. परंतु विनायक बांगडे हे या निवडणुकीत तग धरू शकणार नाही. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन धानोरकर यांना ती बहाल करावी, असा मागणीवजा विरोध मतदार संघात सुरू झाला.
सोशल मीडियावर हा विरोध टोकाला गेला होता. मतदार संघातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशा इशाराही दिला जात होता. हा विरोध पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचला. यानंतर पुन्हा चंद्रपूरचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू झाल्या. वरिष्ठ नेत्यांच्या रविवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: हस्तक्षेप करून बाळू धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे समजते.
तिकडे रविवारी भाजपाच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपाने भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.भाजपाची तिकीट कुणाला मिळणार यावर तर्कवितर्क लावले जात होते. वृत्तवाहिन्यांवर सकाळपासूनच सुनील मेंढे यांचे नाव झळकत होते. मात्र त्याला अधिकृत दुजोरा कुणीही देत नव्हते. अखेर सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने एक प्रसिध्दी पत्रक जारी केले. त्यात देशभरातील नऊ उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्टÑातील एकमेव भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनील मेंढे नावाचा समावेश आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पार्टी, एकच मिशन शेतकरी आरक्षण, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना पुरस्कृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

रामटेक मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री व अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी लढण्यास नकार देत ऐनवेळी गजभिये यांचे नाव समोर केले. उमेदवारीसाठी काँग्रेसच्या अ.भा. अनूसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनीही दिल्लीत बरीच फिल्डिंग लावली. मात्र, वासनिक यांच्या वजनापुढे राऊत यांचे फासे उलटे पडले. गजभिये यांनी विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळी भाजपाचे अनिल सोले विजयी झाले. गजभिये दुसºया क्रमांकावर होते. दोन निवडणुकीमध्ये गजभिये यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. हे पाहून बेरजेचे समीकरण साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी किशोर गजभिये यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला होता.

शरद पवार आणि शिवाजीराव मोघे मदतीला
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसला निवडणूक जिंंकायची असेल तर बाळू धानोरकर हे दमदार उमेदवार आहेत. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे त्यांच्या मदतीला धावले. इतकेच नव्हे, तर त्यांनी ही बाब आघाडीचे नेते शरद पवार यांच्यापर्यंत पोहचविली. त्यांनी ती पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कानावर घातली. यानंतर धानोरकरांची उमेदवारी जाहीर झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Congress candidate from Chandrapur Dhanarkar and Ramtek Kishore Gajbhai for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.