दिल्लीत आपमुळे कॉंग्रेसचा पराभव, दिग्विजय सिंह यांची टीका

By Admin | Published: April 26, 2017 09:04 PM2017-04-26T21:04:51+5:302017-04-26T21:05:03+5:30

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी आप सोबतच ईव्हीएम प्रणालीवर जोरदार हल्लाबोल केला. आप मुळेच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूकांत कॉंग्रेसचा

Congress defeats Congress due to its failure, Digvijay Singh criticized | दिल्लीत आपमुळे कॉंग्रेसचा पराभव, दिग्विजय सिंह यांची टीका

दिल्लीत आपमुळे कॉंग्रेसचा पराभव, दिग्विजय सिंह यांची टीका

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 26 -   दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. बुधवारी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी  आप सोबतच  ईव्हीएम  प्रणालीवर जोरदार हल्लाबोल केला.  आप मुळेच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूकांत कॉंग्रेसचा पराभव झाल्याचा त्यांनी आरोप केला. सोबतच  ईव्हीएम प्रणालीवरदेखील त्यांनी जोरदार टीका केली.
नागपुरात आले असता दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. दिल्ली महानगरपालिका निवडणूकांत ह्यआपह्णमुळे भाजपाला फायदा झाला व कॉंग्रेसचा पराभव झाला. गोव्यामध्ये  आपचा सफाया झाला. परिणामी कॉंग्रेस अव्वल स्थानी राहिली.  आपची स्थापनाच भाजपाला मदत करण्यासाठी झाली आहे, असे सिंह म्हणाले. निवडणूकांमध्ये  ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले आहे. यावेळी त्यांनी  ईव्हीएमवरदेखील भाष्य केले.  ईव्हीएमला  हॅक करणे कठीण नाही. विकसित देशांप्रमाणे आपल्या देशातदेखील मतपत्रिकेच्या माध्यमानेच निवडणूक घेतली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

नक्षलग्रस्त भागात आदिवासींना सक्षम करावे


छत्तीसगडमधील सुकमा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अप्रत्यक्षपणे या प्रकाराला तेथील राज्य सरकारला जबाबदार ठरविले. या भागातील तेंदुपत्ता व दारुचे ठेकेदार हे नक्षलवादी व पोलीसांमधील दुवा आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकाळात तेथील ठेकेदारी पद्धती बंद झाली होती. मात्र भाजपाने ही पद्धत परत सुरू केली. जोपर्यंत ही प्रणाली सुरू आहे, तोपर्यंत नक्षलवाद संपुष्टात येऊ शकत नाही. नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना सक्षम करण्याची आवश्यकता आहे. नक्षलवादी व शासनाच्या मध्ये त्यांची कुचंबणा होते, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

Web Title: Congress defeats Congress due to its failure, Digvijay Singh criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.