काँग्रेसचा वाद दिल्ली दरबारी
By admin | Published: April 9, 2017 11:20 PM2017-04-09T23:20:20+5:302017-04-09T23:20:20+5:30
महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतररही नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी संपण्याची चिन्हे नाहीत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतररही नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी संपण्याची चिन्हे नाहीत. आता नागपुरातील काँग्रेसचा वाद दिल्ली दरबारी पोहचला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व नगरसेवकांचा समावेश असलेले सुमारे ५५ जणांचे शिष्टमंडळ रविवारी राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. संबंधित शिष्टमंडळ अ.भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेणार असून पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेता बदलण्याची मागणी करणार आहेत.
माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्यासह सुमारे ११ ते १२ नगरसेवक व सुमारे ४४ ते ४५ पदाधिकाºयांचे शिष्टमंडळ रविवारी रात्री राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीसाठी रवाना झाले. ११ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिली आहे, अशी माहिती दिल्ली मोहिमेत सहभागी असलेल्या एका काँग्रेस नेत्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.