काँग्रेसला गटबाजी भोवली
By admin | Published: February 24, 2017 02:54 AM2017-02-24T02:54:19+5:302017-02-24T02:54:19+5:30
गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत सत्ता गाजवत असलेल्या भाजपला यावेळी हद्दपार करण्याची काँग्रेसला संधी होती.
कमलेश वानखेडे नागपूर
गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत सत्ता गाजवत असलेल्या भाजपला यावेळी हद्दपार करण्याची काँग्रेसला संधी होती. मात्र, अंतर्गत गटबाजीने ग्रासलेल्या काँग्रेसला विरोधकांशी लढण्यासाठी वेळच मिळाला नाही. काँग्रेस नेत्यांची आपसातच ‘दंगल’ सुरू राहिली. याचा आयता फायदा भाजपाला मिळाला. गेल्यावेळी ४१ वर स्थिरावलेली काँग्रेस यावेळी २९ पर्यंत खाली घसरली. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत विकास ठाकरे यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकास कामांची मेट्रोे सुसाट असताना काँग्रेस नेत्यांना एकत्र येत तिला ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपसात भांडण्यालाच प्राधान्य दिले. पक्षबांधणी करून एकोप्याने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस नेते कधीच एकत्र