मौदात भाजप-राष्ट्रवादी युतीला काँग्रेसचा दे धक्का, आ. टेकचंद सावरकर यांच्या गटाचे पानीपत
By जितेंद्र ढवळे | Published: April 30, 2023 09:11 PM2023-04-30T21:11:00+5:302023-04-30T21:11:06+5:30
18 पैकी 16 जागा जिंकत काँग्रेसचा एकतर्फी विजय
मौदा (नागपूर) : मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या समर्थित गटाने राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या युतीला मतदारांनी नाकारले. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर व उदध्व ठाकरे गटाचे देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वातील पॅनलने१६ जागा जिंकत सत्ता काबीज केली, तर भाजप गटाकडे १ राष्ट्रवादीच्या गटाला जेमतेम एक जागा जिंकण्यात यश आले.
मौदा बाजार समितीवर भाजपचे यांचे वर्चस्व होते. मात्र, उमेदवार ठरविताना मतभेद झाले व काँग्रेस व उदध्व ठाकरे गट यांनी पॅनल लढविण्याचा निर्णय घेत सावरकर यांना आव्हान दिले. आ.सावरकर यांनी ताकद लावली, पण काँग्रेस कार्यकर्ते फुटले नाहीत. शेवटी केदार गटाच्या पॅनलने १६ जागांवर दणदणीत विजय मिळविला, केदार यांच्या सहकार पॅनलचे सेवा सहकारी गटातून सेवा सहकारी गटातुन चंद्रभान किरपान, राजेश ठवकर,ज्ञानेश्वर वानखेडे, अनिल कोंगे, नंदलाल पाटील,दिगाबंर बांगळकर, दादाराव सारवे,रामनरेश सेनवार, सुनील दारोडे, मंगेश तलमले,प्रमोद बरबटे, सर्वसाधारण स्त्री महिला कल्पना चरडे,मंदा तुमसरे, व्यापारी गटाचे राजेंद्र लांडे,सावनकुमार येळणे तर अनुसूचित जाती गटातुन रोशन मेश्राम व राष्ट्रवादी आर्थिक दुर्बल घटक गटातुन पुथ्विराज गुजर व भाजप गटाचे मोरेश्वर सरोते विजयी झाले. विजयी उमेदवारांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद सभापती अंवतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख तापेश्वर वैद्य, दिनेश ढाले, स्वप्निल श्रावनकर, अनुराग भोयर आदींनी स्वागत केले.