काँग्रेस वाढली, भाजप फुटली अन् सेना घटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 09:58 PM2018-07-28T21:58:43+5:302018-07-28T21:59:38+5:30

पारशिवनी नगर पंचायतचा निकाल लागल्यानंतर त्यावर आता विचारमंथन सुरू झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता पारशिवनीत शिवसेनेला खूप मोठा फटका बसला. दुसरीकडे काँग्रेसची मते वाढल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे, पारशिवनीत गटातटाचे राजकारण होऊनही काँग्रेसला मिळालेली ही मते समाधानकारक आहेत. भाजपचा विचार करता सर्व उमेदवारांना मिळालेली मते ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाली असती तर नगराध्यक्षही त्यांचा असता. परंतु मते फुटल्याने भाजपला फटका बसला.

Congress grew, BJP split and sena reduced! | काँग्रेस वाढली, भाजप फुटली अन् सेना घटली !

काँग्रेस वाढली, भाजप फुटली अन् सेना घटली !

Next
ठळक मुद्देपारशिवनीच्या निकालाचा सार : विधानसभेची गोळाबेरीज सुरू

गणेश खवसे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारशिवनी नगर पंचायतचा निकाल लागल्यानंतर त्यावर आता विचारमंथन सुरू झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता पारशिवनीत शिवसेनेला खूप मोठा फटका बसला. दुसरीकडे काँग्रेसची मते वाढल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे, पारशिवनीत गटातटाचे राजकारण होऊनही काँग्रेसला मिळालेली ही मते समाधानकारक आहेत. भाजपचा विचार करता सर्व उमेदवारांना मिळालेली मते ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाली असती तर नगराध्यक्षही त्यांचा असता. परंतु मते फुटल्याने भाजपला फटका बसला.
रामटेक विधानसभा मतदारसंघांतर्गत पारशिवनीचा समावेश होतो. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पारशिवनी शहरातील सर्व बूथवर शिवसेनेला ३,२४६ मते मिळाली होती. काँग्रेसला शहरातून ११४५ मते तर भाजपला ५८९ मते मिळाली होती. नगर पंचायतच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरिता या मतांमध्ये खूप मोठा फरक पडलेला दिसून येतो. शिवसेनेची तब्बल ८०६ मते घटून ती २,४४० पर्यंत खाली आली. काँग्रेसची मते ही १०८४ ने वाढून २,२२९ वर पोहोचली. तर भाजपलाही पारशिवनीत ‘अच्छे दिन’ येत ५८९ मध्ये ११९६ ची भर पडून १७८५ मतांपर्यंत पोहोचता आले.
शिवसेनेचा गड राखण्यात पारशिवनीचा महत्त्वपूर्ण हातभार असायचा. मात्र या नगर पंचायतच्या निवडणुकीत शिवसेनेची मते खाली घसरल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतील चित्राबाबत शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच काय तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला २,४४० मते मिळालेली असताना वॉर्डांमधील सर्व उमेदवारांना एकूण २,०२७ मते मिळाली. ४१३ मते शिवसेनेची फुटली. नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले. याशिवाय नऊ वॉर्डांमध्ये आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने दुसरे स्थान कायम ठेवले. शिवसेनेचे चार उमेदवार निवडून आले असले तरी, एकूण सहा वॉर्डांमध्ये दुसºया स्थानापर्यंत झेप घेता आली. काँग्रेसच्या तुलनेत शिवसेना उमेदवार हे अर्ध्यावरच पोहोचले.

भाजपला वॉर्डांमध्ये फटका
पारशिवनी नगर पंचायतमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला २,२४०, काँग्रेसच्या उमेदवाराला २,२२९ तर भाजपच्या उमदेवाराला १७८५ मते मिळाली. एकूण १७ वॉर्डांमधील भाजपच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या ही २,४८६ आहे. हीच मते भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाली असती तर आज पारशिवनीत भाजपचा नगराध्यक्ष असता. मात्र वॉर्डांमध्ये भाजपला फटका बसला. तब्बल ७०१ मते नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला कमी मिळाली. काँग्रेसचा विचार केल्यास १६ वॉर्डांमध्येच काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यांना १८८२ मते मिळाली. त्यापेक्षा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला ३४७ मते ही अतिरिक्त मिळाली. याचा दुसºया बाजूने विचार केल्यास भाजपची मते फुटून ती काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली.

Web Title: Congress grew, BJP split and sena reduced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.