काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज नागपुरात दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:30 AM2019-01-10T01:30:54+5:302019-01-10T01:33:08+5:30

प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा आज, गुरुवारी नागपूर विभागात दाखल होत आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या अभियानामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.

Congress Jan Sangharsh Yatra in Nagpur today | काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज नागपुरात दाखल होणार

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज नागपुरात दाखल होणार

Next
ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांचा सहभाग : रामटेक येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा आज, गुरुवारी नागपूर विभागात दाखल होत आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या अभियानामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.
जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभागाचे चार टप्पे उत्साहात पूर्ण झाले आहेत. गुरुवारी सकाळी १० वा. दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्यानंतर ताजबाग आणि गणेश टेकडी येथे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रेचा नागपूर विभागातील प्रवास सुरू होईल. दुपारी १२ वाजता कामठी येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून दुपारी २.३० रामटेक येथे पहिली जाहीर सभा होईल. त्यानंतर तुमसर (जि. भंडारा) येथे यात्रेचे स्वागत होईल. सायंकाळी ६ वा. तिरोडा येथे जाहीर सभा होईल.
शुक्रवारी गोंदिया, सडक अजुर्नी, साकोली येथे यात्रा पोहोचेल. १२ जानेवारी रोजी भंडारा, चिमूर येथे सभा होईल. यानंतर वरोरा येथे यात्रा पोहोचेल. सायंकाळी चंद्रपूर येथे रॅली व जाहीर सभा होणार आहे. रविवार, १३ जानेवारी रोजी गडचिरोली, ब्रम्हपुरी येथे यात्रा येऊन पाचव्या टप्प्याची सांगता सभा सायंकाळी ६ वाजता नागपूर येथे होईल. या यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
नेते, कार्यकर्ते सज्ज
 नागपुरातील सद्भावना लॉन, पोलीस लाईन टाकळी येथे जनसंघर्ष यांत्रेचा समारोपीय सभेच्या तयारीसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात आढावा बैठक घेण्यात आली. ब्लॉक अध्यक्षांना व पदाधिकारी यांना विविध जबाबदारीचे वाटप करण्यात आले. जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाकरिता किमान तीन हजार लोकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

Web Title: Congress Jan Sangharsh Yatra in Nagpur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.