काँग्रेस नेत्यांनी गांधींनाही विभागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 01:10 AM2017-10-03T01:10:52+5:302017-10-03T01:11:19+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला व काँग्रेसला एकसंघ केले. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी यंदाही एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांधी जयंती साजरी केली.

Congress leaders also divided Gandhi to the people | काँग्रेस नेत्यांनी गांधींनाही विभागले

काँग्रेस नेत्यांनी गांधींनाही विभागले

Next
ठळक मुद्देगांधी जयंतीचे यंदाही वेगवेगळे कार्यक्रम : गटबाजी कायम; कार्यकर्ते गोंधळात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला व काँग्रेसला एकसंघ केले. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी यंदाही एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांधी जयंती साजरी केली. या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील दुफळीचे दर्शन घडले. देशात, राज्यात नव्हे तर महापालिकेतही काँग्रेस सत्तेत नाही. अशावेळी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज असताना काँग्रेस नेत्यांनी गांधीजींचीच विभागणी केली, हे पक्षासाठी सुचिन्ह नाही, अशीच परिस्थिती कायम राहिली तर पक्ष कसा मजबूत होणार, अशी प्रतिक्रिया सामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत होते.
गेल्या दोन-अडीच वर्र्षांपासून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली. शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून हा वाद वाढला. त्यातच महापालिकेतील विरोधी पक्षनेते व नामनिर्देशित सदस्याच्या निवडीवरून हा वाद आणखी विकोपाला गेला. अद्यापही धुसफूस कायम असून, आता ती गांधी जयंती वेगळीवेगळी करण्यापर्यंत पोहोचली. जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती व नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे सोमवारी सकाळी ९ वाजता व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या लीलाताई चितळे, गांधीवादी मा. म. गडकरी, नारायणराव चांदपूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, माजी आमदार यादवराव देवगडे, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबुराव तिडके, ‘स्वयं’ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते. तर त्याचवेळी युवक काँग्रेसच्या बॅनरखाली चितार ओळ येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. सुनील केदार, अशोक धवड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके आदी उपस्थित होते.
दोन्ही कार्यक्रमांना नगरसेवक उपस्थित होते. शहर काँग्रेसचे पदाधिकारी व्हेरायटी चौकातील कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. काहींनी दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही नेत्यांमधील वाद संपुष्टात येत नसल्याबाबतची चिंता दोन्ही कार्यक्रमात कार्यकर्ते व्यक्त करीत होते.
चितारओळ येथे गटबाजी संपविण्याचे आवाहन
चितार ओळ येथील गांधी जयंतीच्या कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षातील प्रस्थापित नेत्यांना आपसातील गटबाजी संपवून पक्ष बळकट करावा, असे आवाहन केले तसेच गांधींजींना हीच खरी आदरांजली ठरेल, असा सल्ला दिला. या कार्यक्रमाला अ.भा.सेवादल संघटक कृष्णकुमार पांडे, नगरसेवक किशोर जिचकार, दिनेश यादव, परसराम मानवटकर, इरफान काजी, अयाज शेख, राकेश निकोसे, राजेंद्र ठाकरे, स्वप्निल बावनकर, सतीश पाली, हेमंत कातुरे, आशिष लोणारकर, सागर चौव्हाण, पूजक मदने, नीलेश देशभ्रतार, फैजलूर रहमान कुरेशी, फरदीन खान, माजी नगरसेविका मालू वनवे, शेवंता तेलंग यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना नेत्यांनी मार्गदर्शन केले.
व्हेरायटी चौकात आदरांजली
व्हेरायटी चौकात आयोजित कार्यक्रमात विकास ठाकरे यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण के ल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. गायिका सुरभी ढोमणे व सचिन ढोमणे यांच्या सूरसंगम वाद्यवृंद समूहाने राष्ट्रभक्तीपर गीत व भजनांनी उपस्थितात राष्ट्रभक्ती जागविली. जुन्या पिढ्यापासून भावी पिढ्यापर्यंत महात्मा गांधी यांचे विचार पोहोचविण्याचे कार्य शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. गांधी यांच्या विचाराचा प्रसार हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन विकास ठाकरे यांनी यावेळी केले. विलास मुत्तेमवार, हरिभाऊ नाईक, उमेश चौबे, लीलाताई चितळे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला माजी महापौर नरेश गावंडे, किशोर डोरले, माजी उपमहापौर अण्णाजी राऊ त, घनश्याम पनपालिया, काँग्रेस कमिटीचे महामंत्री डॉ. गजराज हटेवार, राजू व्यास, प्रशांत धवड, रमण पैगवार, जयंत लुटे, अशोक यावले, बंडोपंत टेंभुर्णे, दीपक वानखेडे, विठ्ठलराव कोंबाडे, नगरसेवक संजय महाकाळकर, नरेश सिरमवार, नितीन साठवणे, हर्षला साबळे, मनोज साबळे, उज्ज्वला बनकर, दर्शनी धवड, नेहा निकोसे, साक्षी राऊ त, माजी नगरसेवक शीतल घरत, अ‍ॅड. रेखा बाराहाते, सरस्वती सलामे, सुजाता कोंबाडे, देवा उसरे, रमेश चौकीकर, अंबादास गोंडाणे, राजकुमार कमनानी, अमित पाठक, प्रभाकर खापरे, शंकर देवघरे, पंकज निघोट, पंकज थोरात, निर्मला बनकर, अनिल पांडे, राजेश पौनीकर, दिनेश बानाबाकोडे, प्रकाश बांते यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. डॉ. गजराज हटेवार यांनी संचालन तर आभार रामगोविंद खोब्रागडे यांनी मानले.

Web Title: Congress leaders also divided Gandhi to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.