नागपुरात काँग्रेस प्रचाराचा भव्य स्कूटर रॅलीने समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:53 PM2019-04-09T22:53:28+5:302019-04-09T22:55:31+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह संयुक्त महाआघाडीचे नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ मंगळवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शहराच्या विविध भागातून भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह संयुक्त महाआघाडीचे नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ मंगळवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शहराच्या विविध भागातून भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे,माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड,महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अॅड. अभिजित वंजारी,नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, विशाल मुत्तेमवार, माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन, नगरसेवक दुनेश्वर पेठे, रमेश पुणेकर, पुरुषोत्तम हजारे, प्रशांत धवड, संदेश सिंगलकर, जयदीप कवाडे, आकाश तायडे, नाना झोडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल यांच्यासह पक्षाच्या विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळी ८ च्या सुमारास व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅली यशवंत स्टेडियम, धंतोली, अजनी रेल्वे स्टेशन, वंजारी पाणी टाकी, अजनी पोलीस स्टेशन, तुकडोजी पुतळा, छोटा ताजबाग, सक्करदरा, भांडे प्लॉट, नंदनवन चौक, जागनाथ चौक, गंगाबाई घाट, कुंभारटोली, बगडगंज चौक,आंबेडकर चौक गार्डन मैदान, वर्धमान नगर, एच.बी.टाऊन, भरतनगर चौक, विनोबा भावे चौक, इंदोरा चौक, दस नंबर पुलीया, मेकोसाबाग, कडबी चौक, क्लार्क टाऊन, मानकापूर, जाफर नगर चौक,अनंतनगर,दिनशॉ आईसक्रीम फॅक्टरी, गिट्टीखदान, केटीनगर, फुटाळा,रविनगर क्वार्टर, रविनगर चौक, बाजीप्रभू चौक, लक्ष्मीभवन, धरमपेठ, ट्राफीक पार्क, रामदासपेठ, पंचशील चौक, धंतोली, घाट रोड, कॉटन मार्केट, शुक्रवारी, टाटा पारसी स्कूल, लोधीपुरा चौक, गीतांजली टाकीज,सीए रोड, अग्रेसन चौक, डागा दवाखाना, गांधीबाग बगिचा, नंगा पुतळा, सोनार ओळी, गांधीपुतळामार्गे देवडिया काँग्रेस भवन येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.