दरवाढी विरोधात काँग्रेसचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:45 AM2017-09-27T01:45:20+5:302017-09-27T01:45:31+5:30

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात मंगळवारी काँग्रेसने संविधान चौकात तीव्र आंदोलन करीत असंतोषाचा भडका उडवला. संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत एकाएकी रस्ता रोको केला.

Congress splinter against hike | दरवाढी विरोधात काँग्रेसचा भडका

दरवाढी विरोधात काँग्रेसचा भडका

Next
ठळक मुद्देरास्ता रोको, पोलिसांसोबत धक्काबुक्की : पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात मंगळवारी काँग्रेसने संविधान चौकात तीव्र आंदोलन करीत असंतोषाचा भडका उडवला. संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत एकाएकी रस्ता रोको केला. बळाचा वापर करून रोखण्याचा प्रयत्न करणाºया पोलिसांसोबत आंदोलकांची धक्काबुक्की झाली. या गोंधळात पोलिसांना चकमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळही जाळण्यात आला.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात माजी मंत्री विलास मुत्तेमवार, विशाल मुत्तेमवार, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड. अभिजिंत वंजारी, प्रशांत धवड, संदेश सिंगलकर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवकांनी धरणे देत दरवाढीचा निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी दरवाढीसाठी केंद्र सरकारचा निषेध करणारे, तसेच कर लादून राज्य सरकारने केलेली वाढ या विरोधात पोस्टर्स झळकविले.
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल दरवाढीची तुलनात्मक वास्तविकता मांडणारी पत्रके यावेळी वाहनचालकांना वाटण्यात आली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात कच्च्या तेलाचे दर १४० डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहचले होते. तरी त्यांनी पेट्रोलची दरवाढ नियंत्रणात ठेवली. आता पंतप्रधान मोदी यांच्या काळात कच्चे तेल ४० ते ५० डॉलर प्रती बॅरल आले असतानाही पेट्रोलचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. जनतेला दिलासा देण्यात मोदी अपयशी ठरले आहेत, अशी टीका या वेळी वक्त्यांनी केली. महाराष्ट्रात विविध प्रकारचे कर आकारले जात आहेत. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत इंधनाच्या दरात ११ रुपयांनी वाढ झालेली आहे. राज्य सरकारने लावलेले कर परत घ्यावे, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली. नेत्यांच्या भाषणानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. विकास ठाकरे यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट ढकलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखून धरले. यामुळे कार्यकर्ते भडकले व बॅरिकेट तोडून रस्त्यावर पोहचले. गाड्या अडवून घोषणाबाजी केली. यामुळे टी पॉर्इंट पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांचा प्रतिकार केला. सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. यामुळे तणाव निर्माण झाला होता. आंदोलनात संजय महाकाळकर, रेखा बाराहाते, सुजाता कोंबाडे, गुड्डू तिवारी, गजराज हटेवार, संजय सरायकर, प्रमोद सिंग ठाकूर, राजू भोतमांगे, ईश्वर बरडे, सुभाष मानमोडे, मनोज साबळे, मिलिंद सोनटक्के, राजू व्यास, जयंत लुटे, विक्रम पनकुले, दीपक वानखेडे, आकाश तायवाडे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, पंकज थोरात, पंकज निघोट, ईरशाद अली, अरविंद वानखेडे आदींचा समावेश होता.

Web Title: Congress splinter against hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.