गिट्टीखदानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला लॉकडाऊनचा विरोध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:08 AM2021-03-16T04:08:00+5:302021-03-16T04:08:00+5:30
नागपूर : नागपुरात वाढत्या कोराना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्र्यांनी शहरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी ...
नागपूर : नागपुरात वाढत्या कोराना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्र्यांनी शहरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सोमवारी खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यांनीच विरोध केला. गिट्टीखदान परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त करीत बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणीही केली.
यावेळी पश्चिम नागपूर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष रिजवान खान रुमवी, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सत्यम साेडगीर, राशीद अब्दुल, इरफान सेख, शोएब अली, जुबैर शेख आदी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे गरीब व मध्यमवर्गीयांना मोठा त्रास होतो. एकीकडे लॉकडाऊन लावला जात आहे, दुसरीकडे विजेचे बिल व करसुद्धा वसूल केला जात आहे. सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर गरिबांच्या खात्यात किमान पाच हजार रुपयाची आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.