हज हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने : रेशीमबागमध्ये होणाऱ्या हज प्रशिक्षणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:03 AM2019-07-04T01:03:51+5:302019-07-04T01:04:56+5:30
महाराष्ट्र राज्य हज समितीने ७ जुलै रोजी रेशीमबाग येथील भट सभागृहात हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण स्थळावरून आता वाद निर्माण झाला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिक कुरैशी यांच्या नेतृत्वात हज हाऊस समोर समितीच्या निर्णयाला विरोध केला आहे. राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनमानी करीत असल्याचा आरोप केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य हज समितीने ७ जुलै रोजी रेशीमबाग येथील भट सभागृहात हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण स्थळावरून आता वाद निर्माण झाला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिक कुरैशी यांच्या नेतृत्वात हज हाऊस समोर समितीच्या निर्णयाला विरोध केला आहे. राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनमानी करीत असल्याचा आरोप केला आहे.
एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात नागपूरसह विदर्भातून दोन हजार यात्रेकरून प्रशिक्षण घेणार आहे. नागपुरात हज हाऊस असताना प्रशिक्षण रेशीमबागेत का होत आहे? यावर आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हज हाऊस समोर निदर्शने करून प्रशिक्षण हज हाऊसमध्येच घ्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी इरशाद अली, नगरसेवक रमेश पुणेकर, हाजी मो. समीर, मुमताज अहमद, शाहबाज खान, मुख्तार अन्सारी, जुनैद अहमद, आरिफ खान, मो. हाशिम, मोहसीन शेख, इमरान शेख, अरशद अन्सारी, सुरेंद्र मेश्राम, अक्षय डोर्लीकर, अमन शेख, फैजल खान, तौसीफ कुरेशी, रिजवान खान, अब्दुल रशीद, मो. अकरम आदी उपस्थित होते.
हज यात्रेवरून राजकारण - कुरेशी
शहर काँग्रेस सचिव अतिक कुरेशी म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात १५ कोटी रुपये खर्चून हज हाऊस तयार करण्यात आले. २०१२ पासून हजचे प्रशिक्षण हज हाऊसमध्येच होत आहे. परंतु हज समितीचे अध्यक्ष पर्याप्त जागा नसल्याचा हवाला देत हज समितीच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून हज यात्रेवरही भाजपा आता राजकारण करीत आहे. हज प्रशिक्षण हज हाऊसमध्ये व्हावे, यासाठी समितीच्या अध्यक्षाची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी भेटण्यास नकार दिला.
हज हाऊसमध्ये पर्याप्त जागा नाही
हज प्रशिक्षण शिबिरासाठी आवश्यक जागा हज हाऊसमध्ये नाही. यापूर्वीही विदर्भस्तरीय हज प्रशिक्षणाचे कार्यक्रम बाहेर झाले आहे. त्यामुळे हज प्रशिक्षणाचा कार्यक्रम योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे.
मौलाना आलमगीर अशरफ
भट सभागृह चांगली जागा आहे
राज्य हज समितीने प्रशिक्षणासाठी हज हाऊसची निवड विचारपूर्वक केली आहे. शिबिरासाठी विदर्भातून हज यात्री प्रशिक्षणासाठी येत असल्याने, त्यांच्या व्यवस्थेसाठी भट सभागृह अगदी योग्य आहे.
वकील परवेज