गडकरींच्या कामांना काँग्रेसवालेही नाकारणार नाही : शाहनवाज हुसैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:09 AM2019-04-06T00:09:51+5:302019-04-06T00:12:09+5:30

नागपूर बदल रहा है, याची जाणीव आज मला नागपुरात आल्यानंतर झाली. पाच वर्षापूर्वीचे नागपूर आणि आताच्या नागपूरमध्ये कमालीचा बदल झाला आहे. हे केवळ नितीन गडकरी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. निवडणुकींमध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार असले तरी, गडकरींच्या कामाला काँग्रेसवालेही नाकारणार नाही, अशी भावना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी केले.

Congressmen will not deny Gadkari's work: Shahnawaz Hussain | गडकरींच्या कामांना काँग्रेसवालेही नाकारणार नाही : शाहनवाज हुसैन

गडकरींच्या कामांना काँग्रेसवालेही नाकारणार नाही : शाहनवाज हुसैन

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरच्या विकासावर व्यक्त केली भावना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर बदल रहा है, याची जाणीव आज मला नागपुरात आल्यानंतर झाली. पाच वर्षापूर्वीचे नागपूर आणि आताच्या नागपूरमध्ये कमालीचा बदल झाला आहे. हे केवळ नितीन गडकरी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. निवडणुकींमध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार असले तरी, गडकरींच्या कामाला काँग्रेसवालेही नाकारणार नाही, अशी भावना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी केले.
मोठा ताजबाग येथे नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, जमाल सिद्दीकी, अमीन पठाण, नागेश सहारे, लाला कुरेशी, रमेश सिंगारे, सतीश लोणारे, हैदर आलम आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, गडकरी हे विकासपुरुष आहे. संपूर्ण देशात त्यांनी केलेल्या कामाचा डंका आहे. मी स्वत: त्यांच्याकडून माझ्या क्षेत्रात पाच हजार कोटीचे काम करून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा अग्रेसर होत आहे. पण नितीन गडकरीच्या कामामुळे पक्षाला बळ मिळत आहे. त्यांच्या कामाची कुठेही तुलना होऊ शकत नाही. त्यांनी काम करताना जातपात, पक्ष, धर्म कुठेही बाळगला नाही. त्यामुळे नागपूरकरांनी या विकास पुरुषाच्या पाठीशी राहिले पाहिजे.

Web Title: Congressmen will not deny Gadkari's work: Shahnawaz Hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.