सरकार विरोधात काँग्रेसचा ‘जनआक्रोश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:21 AM2017-10-30T00:21:56+5:302017-10-30T00:22:33+5:30

राज्यातील भाजप -शिवसेना युती सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपल्या प्रगतीचा आलेख मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Congress's 'Shock' against the government | सरकार विरोधात काँग्रेसचा ‘जनआक्रोश’

सरकार विरोधात काँग्रेसचा ‘जनआक्रोश’

Next
ठळक मुद्देचंद्रपुरात होणार विभागीय मेळावा : अधिवेशनावर काढणार शेतकरी दिंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील भाजप -शिवसेना युती सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपल्या प्रगतीचा आलेख मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. वास्तविक नोटाबंदी व जीएसटीचा सर्वच स्तरातील लोकांना फटका बसला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण शेतकºयांना लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. सरकारविषयी जनतेच्या मनातील आक्रोश जनतेत जाऊन मांडण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. ३१ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनआक्रोश’ राबविला जाणार असून नागपूर विभागाचा मेळावा ६ नोव्हेंबरला चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर रविवारी रविभवन येथे काँग्रेस पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली.
३१ आॅक्टोबरला अहमदनगर येथील मेळाव्याने या आंदोलनाची सुुरुवात होईल. ८ नोव्हेंबरला सांगली येथील मेळाव्याने याचा समारोप होईल. अशी माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माजी आमदार एस.क्यू.जामा, समन्वयक सुरेश भोयर व राजेंद्र दरेकर आदी उपस्थित होते.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील काँग्रेस पदाधिकाºयांची रविभवन येथे बैठक घेण्यात आली. आंदोलन व्यापक स्वरुपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकºयांच्या आत्महत्या व कीटकनाशकांच्या बळींची संख्या वाढतच आहे. याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला.
राज्य सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याने जनतेत आक्रोश आहे. काँग्रेस जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या पाठिशी उभी आहे. नागपूर येथे होणाºया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ‘शेतकरी दिंडी’काढण्यात येणार आहे. याबातची तारीख प्रदेश काँग्रेस लवकरच निश्चित करणार असल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली.
कापूस-सोयाबीनला भाव नाही
कापसला ३५०० रुपये तर सोयाबीनला २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. धानाचीही अशीच अवस्था आहे. कापसाला ७००० तर सोयाबीनला ५००० रुपये भाव मिळावा. राज्य सरकार उत्पादन खर्चाच्या आधारे शेतमालाचे भाव काढतात. परंतु शेतमालाचे भाव केंद्रीय कृषी मूल्य आयोग निश्चित करते. केंद्राचे भाव कमी असल्याने या भावातील फरकाची रक्कम राज्य सरकारने शेतकºयांना द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन
अधिवेशनावर शेतकरी दिंडी काढली जाणार आहे. औरंगाबाद येथून ही दिंडी निघणार असून नागपुरात तिचा समारोप होईल. या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका स्तरावर मेळावे आयोजित करून वातावरण निर्मिती करण्यात येईल. याची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
शिवसेनेची भूमिका दुटप्पी
राज्यातील युती सरकार विषयी जनतेच्या मनात असंतोष आहे. शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. शेतकºयांविषयी तळमळ असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
१६ हजार शेतकºयांची वीज तोडली
शेतकरी संकटात असतानाही थकबाकीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा माहवितरण कंपनीने लावला आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील १६ हजार शेतकºयांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दुसरीकडे सरकार आर्थिक संकटात असूनही राज्यातील सिमेंट रोडसाठी सल्लागाराला एक हजार क ोटी देणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
रविभवन येथे विभागीय बैठक
जनआक्र ोश आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर नागपूर विभागातील काँग्रेसच्या पदाधिकाºयांची रविवारी रविभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी माणिकराव ठाकरे , विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, पदाधिकारी बबनराव तायवाडे,एस.क्यू.जामा, सुरेश भोयर व राजेंद्र दरेकर, माजी आमदार सेवक वाघाये, अविनाश वारजूकर, बंडू सावरबांधे, अ‍ॅड. अभिजित वंजारी,चंद्रपाल चौकसे, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडधे, संजय महाकाळकर, कुंदा राऊ त, हर्षवर्धन निकोसे, प्रकाश वसू, मुजीब पठान, संजय सिंगलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress's 'Shock' against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.