पथदिव्यांची वीज तातडीने जोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:09+5:302021-07-01T04:08:09+5:30

उमरेड : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावाच्या पथदिव्यांचे बिल अदा करण्यात यावे, असे शासकीय आदेश असतानाही विद्युत ...

Connect the streetlights immediately | पथदिव्यांची वीज तातडीने जोडा

पथदिव्यांची वीज तातडीने जोडा

Next

उमरेड : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावाच्या पथदिव्यांचे बिल अदा करण्यात यावे, असे शासकीय आदेश असतानाही विद्युत वितरण कंपनी आम्हास त्रास देत आहे. वीज कापण्याची मोहीम गावागावात धडाक्यात सुरू असून, पथदिव्यांची वीज कापू नका. कापलेली वीज तातडीने जोडा, अशी मागणी उमरेड तालुक्यातील सरपंच संघटनेने केली आहे.

उमरेड तालुक्यातील बारव्हा, निरव्हा, गोधनी, मकरधोकडा, गावसूत, बोरगाव, बाम्हणी, आपतूर, आंबोली, पिराया, अकोला, ठोंबरा या गावातील वीज वीज बिलाच्या थकबाकीच्या कारणावरून कापण्यात आली. लाखो रुपयाच्या थकीत बिलाची रक्कम अदा न केल्याने विद्युत विभागाने या गावांमधील पथदिव्यांची वीज कापली आहे. संपूर्ण गावच अंधारात असल्याने यावर संताप व्यक्त होत आहे. पूर्वी पथदिव्यांच्या बिलाचा भरणा जिल्हा परिषदेकडून होत असे. १६ मे २०१८ रोजी ऊर्जा व कामगार विभागाने ग्रामपंचायतस्तरावरील पथदिव्यांची देयके पंधराव्या वित्त आयोगातून भरण्याचा आदेश काढला. त्यानंतर २६ जून २०२० रोजी पंधराव्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचना ग्रामपंचायतीस प्राप्त झाल्या. दुसरीकडे पंधराव्या वित्त आयोगातून पथदिव्यांची देयके भरणे शक्य नाही, अशा संपूर्ण बुचकळ्यात टाकणाऱ्या निर्णयाचा फटका उपरोक्त गावांना बसत आहे. शासनस्तरावरून पथदिव्यांची देयके भरण्याचा नवीन अध्यादेश काढण्यात यावा, अशी सरपंच संघटनेची मागणी आहे. नवीन अध्यादेश येईस्तोवर कोणत्याही गावातील वीज जोडणी खंडित करू नये, अन्थया आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेचे अध्यक्ष अश्विन उके, उपाध्यक्ष कांचन मांडसकर, सचिव राजकुमार राऊत, कोषाध्यक्ष विशाखा गायकवाड, राजेश हजारे, चेतन चौधरी, शिवदास कुकडकर, महेश मरघडे, रेखा गजघाटे, संगीता दांडेकर, सुनंदा उकुंडे, योगिता मानकर, यादव इटनकर, किसन गिरगावळे, पुरुषोत्तम बचाले, विलास माकाडे, छाया शेरके, चेतन चौधरी आदींनी या समस्येकडे निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

आ. राजू पारवे, खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव आदींकडे निवेदन सोपविण्यात आले आहे. वीज कापल्यामुळे उपरोक्त गावांमधील पथदिव्याखाली अंधार पसरला आहे. सर्वत्र रस्त्यावर रात्रीची काळोखाची परिस्थिती असल्याने महिला, तरुणी यांना त्रास सहन करावा लागत आहे.

फोटो : उमरेडचे खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्याकडे निवेदन सोपविताना सरपंच संघटनेचे अध्यक्ष अश्विन उके आणि अन्य.

Web Title: Connect the streetlights immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.